तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 July 2018

भगवतगीता वाटपाचे परिपत्रक मागे छात्र भारतीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर शिक्षण सहसंचालनायची माघार


बाळू राऊत
मुंबई : मुंबईतील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना भगवतगीता वाटपाचे परिपत्रक मागे घेण्याचे आश्वासन मुंबईच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रोहिदास काळे यांनी छात्र भारती विद्यार्थी संघटनेला आज दिले आहे. तसेच भगवतगीतेचे वाटप त्वरीत बंद करण्यात आले आहे, असेही काळे यांनी सांगितले.
नॅक मुल्यांकन प्राप्त महाविद्यालयांना भगवत गीता या धार्मिक ग्रंथाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालयाने दिले होते. याबाबतच्या सूचना संबंधित महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. त्यावर आक्रमक पवित्रा घेत छात्र भारती विद्यार्थी संघटनेने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडे निषेध नोंदविला. आज छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह अमरीन मोगर, रोहित ढाले, सचिन काकड, भगवान बोयाळ, विकास पटेकर, विशाल कदम, समीर कांबळे यांनी उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. संबंधित प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
संविधानाच्या प्रस्ताविकेत भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचे घटनाकारांनी आणि संविधान सभेने जाहीर केले आहे. यानुसार देशाचा कुठलाही अधिकृत धर्म नाही आणि कोणत्याही विचारधारेचे सरकार आले तरी ते त्यांना वाटेल त्या धर्माचे अवडंबर माजवू शकत नाही. सध्याचे भाजप सरकार उजवी विचारधारा घेऊन काम करत असला तरी सरकार राज्य हे घटनेनुसारच चालले पाहिजे, याचा शिक्षण विभागाला विसर पडलेला दिसतो. महाराष्ट्र शिक्षण संचालनालयाने दिलेला भगवद्गीता वाटपाचा आदेश घटनेची पायमल्ली आणि प्रतारणा करणारा आहे. एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी जगभरातील प्रगत राष्ट्रे आटापिटा करत असताना शासकीय संस्थांमधून धार्मिक पुस्तके कशी देऊ शकतो हे समजण्यापलिकडे आहे, असं छात्र भारती विद्यार्थी संघटनेने निवेदनात म्हटलं आहे.
धर्मग्रंथाला विरोध असण्याचे कारण नाही. धर्म ही एक सभ्यता आहे आणि प्रत्येकाने ती खाजगीबाब म्हणून पाळावी. सार्वजनिक ठिकाणी तीचे प्रदर्शन करु नये. भगवतगीतेलाही विरोध असण्याचे कारण नाही. त्यातील भल्याबुऱ्या गोष्टींवर अनेक शतके चर्चा सुरु आहे, सुरु राहील. परंतु या वादात सरकारने पडू नये. तसेच कुठल्या एका धर्माच्या कट्टरवाद्यांना खुश करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्यांशी आणि घटनेच्या अस्तित्वाशी खेळू नये, असा खोचक इशारा छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी शिक्षण विभागाला दिला.

No comments:

Post a Comment