तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

पिककर्ज लाभार्थी शेतक-यांच्या याद्या मराठीत लावा मनसे ची मागणी

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगाव:-येथील भारतीय स्टेट आँफ बँकेंने पिककर्ज मंजुर झालेल्या शेतक-यांच्या याद्या इंग्रजीत लावल्या असल्याने त्या याद्या मराठीत लावण्यात याव्या या मागणीचे निवेदन बँकेचे शाखा अधिकारी यांना सेनगाव तालुका म.न.से.च्या वतीने दि.03 जुलै मंगळवार रोजी देण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेनगाव तालुका अध्यक्ष दत्तराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पदाधिकारी यांनी पिककर्ज मंजुर झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांच्या याद्या इंग्रजीत लावल्या असुन त्या याद्या मराठीत लावण्याच्या मागणीसाठी बँकेच्या शाखा अधिकारी यांना निवेदन दिले असुन त्या निवेदनावर नमुद करण्यात आले आहे की,आपल्या बँकेंमार्फत शेतकरी बांधवांना पिककर्ज वाटप करण्यात येते.तसेच सदर पिककर्ज लाभार्थी शेतक-यांच्या याद्या इंग्रजी भाषेत लावण्यात आल्या आहेत.परंतु सेनगाव तालुका हा अतिमागास असुन पिककर्ज लाभार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान नसल्याने जेमतेम मराठी वाचणे इतपत शिक्षण असल्याने शेतकरी बांधवांना इंग्रजीत लावण्यात आलेल्या याद्या पाहतांना गोंधळुन जात आहेत.आपण केलेल्या इंग्रजी याद्याचा प्रताप बदलुन त्वरीत मराठीत याद्या लावाव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरुन तिव्र आदोंलन छेडेल अशा इशारा देखील देण्यात आला आहे.या निवेदनावर मनसे तालुका अध्यक्ष दत्तराव देशमुख, रामप्रसाद देशमुख, शिवाजी गव्हाणे,अमोल डांगे,गणेश मव्हळे,दिनकर देशमुख, गणेश देशमुख,गजानन बाेरकर,संदीप नागापुरे आदीसह मनसे पदाधिकारी व मनसैनिकांच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment