तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 10 July 2018

राकाँ जिल्हाध्यक्ष दुर्रानी यांची विधानपरिषदे साठी बिनविरोध निवड

प्रतिनिधी

पाथरी:-विधान परिषदेच्या ११ जागांसाठी ११ अर्ज दाखल झाल्याने परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रांनी यांची आज आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली. आज नागपूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी विलास आठवले यांनी निवडीचे प्रमाणपत्र दिले.यावेळी सहकारी आ.राणाजगजीतसिंह पाटील, आ.विजयराव भांबळे व आ.डॉ.मधुसूदन केंद्रे उपस्थित होते.
विधानपरिषदे साठी भाजपा पाच, शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी दोन आणि राकाँला एक आणि एक अन्य अशा अकरा जनांची विधान परिषदेसाठी आज बिनविरोध निवड झाल्याचे निवडूक निर्णय अधिकारी विलास आठवले यांनी घोषित करून आ बाबाजानी दुर्रांनी यांना निवडीचे पत्र दिले दुर्रांनी यांच्या बिनविरोध विजयाचे परभणी जिल्ह्यातील राकाँ कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी स्वागत केले.

No comments:

Post a Comment