तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 July 2018

गेवराई येथील संतसेना मंदिर संस्थानच्या दिंडीस 'पालखी' अर्पण

सुभाष मुळे..
--------------
गेवराई, दि. १२ ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष तथा विठ्ठ्ल-रूक्माई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दत्तासेठ अनारसे यांच्या वतिने संतसेना महाराज पायी दिंडीस 'पालखी' श्री. संतसेना महाराज चरणी अर्पण केली. हि पालखी गेवराईचे उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर यांच्या हस्ते संतसेना महाराज मंदिर संस्थानास अर्पण करण्यात आली.
        याप्रसंगी अशोक कदम यांच्याकडून शंभर ताट व ग्लास तसेच २ राहूट्या, श्री. तुषार वखरे ( औरंगाबाद) यांच्याकडून साऊंड सिस्टीम व दोन मोठया मॅट, श्री रामजी शिंदे (औरंगाबाद) यांच्याकडून १o चटाई मंदिर संस्थानास भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी ह.भ.प. राजेंद्र महाराज पंडित, दिंडी प्रमुख ह.भ.प. भास्कर महाराज खराद, विष्णू वखरे, सुनिल पोपळे, ज्ञानेश्वर चातुर, कैलास काका खंडागळे, नामदेव आहेर, कृष्णा शिंदे, दगडू काका शिंदे, दशरथ पंडीत, रमेश भाऊ पंडीत, सचिन पंडीत, राहूल राऊत, बाळासाहेब आतकरे, माऊली पंडीत, रोहन पंडीत, रामेश्वर राऊत, दिपक पंडीत, आतकरे  सर, कैलास शिंदे, कृष्णा पंडीत, महेश पंडीत, गणेश पंडीत, ओंकार छडेदार, इत्यादी भक्तगण हजर होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment