तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 11 July 2018

विवाहितेला हुड्यासाठी शाररिक मानसिक छळ केल्या प्रकरणी पतीसह दोघा विरुद्ध  गुन्हा दाखल 

संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील सोनाळा पो स्टे मध्ये विवाहितेला हुंड्यासाठी मानसिक शाररीक छळ व कृर्र वागणुक दिल्या प्रकरणी पतीसह दोघा विरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला 
याबाबत थोडक्यात हकीकत असे प्रकारे आहे कि सोनाळा येथील प्रिंयंका चा विवाह बेरळा खुर्द जि नांदेळ येथील सुनिल कुर्दवळ याच्याशी झाला होता प्रियंकाचा पती सुनिल कुर्दवळ याचे विवाह बाह्य संबंध व हुंड्याच्या कारणावरुन प्रियंका बेरळा खुर्द जि नांदेळ सासरी नांदत असतांना शाररिक मानसिक छळ करून क्रुर वागणुक दिली फिर्यादी प्रियंका सुनिल कुर्दवळ या विवाहितेने सोनाळा पो स्टे ला दिलेल्या फिर्यादी वरुन सोनाळा पो स्टे ला आरोपी सुनिल कुर्दवळ , देविदास नागोराव नरवाळे, मंगल देविदास नरवाळे यांच्या विरुद्ध कलम ४९८ , (अ ), 5O4,506,  34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जुंनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक डि बी वाघमोळे करित आहे 

No comments:

Post a Comment