तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 July 2018

नवाज शरीफ आणि मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक, पाकिस्तानात तणावाचे वातावरण.

____________________________________

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नवाज शरीफ यांच्या अटकेच्या पाश्वभूमीवर पाकिस्तानात मोठा तणाव निर्माण झाला असून लाहोरमध्येकाही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तसेच, नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने विमानतळ परिसरात जमले आहेत. तर, काही ठिकाणी हिंसकवळण आले असून पोलिसांनी 378 जणांना ताब्यात घेतले आहे. याचबरोबर, लाहोर विमानतळाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
नवाज शरीफ आणि मरियम नवाज सुरुवातीला लंडनहून अबुधाबीला पोहोचले. त्यानंतर अबुधाबीहून संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास इतिहाद एअरवेजचे विमानाने लाहोरला रवाना झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अबुधाबीहून नवाज शरीफ आणि मरियम नवाज यांच्यासोबत नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोचे अधिकारी सुद्धा विमानात आहेत. त्यांना लाहोर विमानतळावर आल्यानंतर अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले.
नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर, मरियम शरीफ हिला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबर, नवाज शरीफ यांना 8 मिलियन पाऊंडचा दंड, तर मरियमला 2 मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

No comments:

Post a Comment