तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 August 2018

जवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले

किरण घुंबरे पाटील

पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण हत्याराने मारहान करून या तरूणाला जवळा झुटा ते सिमुरगव्हान दरम्यान कॅनॉल मध्ये फेकल्याची घटना शनीवारी १८ ऑगष्ट रोजी उघडकीस आली असून या विषयी पाथरी पोलीसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
जवळा झुटा येथील दिगंबर लिंबाजी नाईकनवरे अस अपहरण करून खुन झालेल्या युवकाचं नाव असून. तो १५ ऑगष्ट पासून गायब असल्याची तक्रार देण्यात आली होती अशी माहीती सुत्रां कडून मिळाली आहे. पंधरा ऑगष्ट रोजी रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी दिगंबर याला फोन करून जवळा झुटा या त्याच्या गावातून रात्री आठ साडे आठच्या सुमारास  बाहेर बोलावले त्या नंतर तो परत न आल्याने या विषयीची तक्रार देण्यात आली होती. दरम्यान शनिवारी सिमुर गव्हाण येथिल कॅनॉल मध्ये एका युवकाची लाश वाहून आल्याचे निदर्शनास आले.या विषयी शहानिशा केली असता ही लाश दिगंबर नाईकनवरे याची असल्याचे लक्षात आल्या नंतर पोलीसांनी लाश ताब्यात घेऊन उत्तरीय तपासनी साठी येथील ग्रामिण रुग्नालयात आणले या तरूनावर तिक्ष्ण हत्याराने वार करून खुन करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून मयताच्या भाऊ दत्ता लिंबाजी नाईकनवरे यांच्या तक्रारी वरून पाथरी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे हा नेमका प्रकार काय आहे हे पोलीस तपासा नंतर समोर येणार आहे.

No comments:

Post a Comment