तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 August 2018

संस्कार प्राथमिक शाळेत ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त

ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी संस्कार प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री दिगंबररावजी धुमाळ साहेब, पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपकजी तांदळे साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गित्ते पी.आर. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री कैलासजी तांदळे , शंकररावजी पेंटेवार [ संचालक पद्मावती शिक्षण संस्था ], नगरसेवक संजयजी फड, परळी भूषण लखनजी भद्रे , प्रकाशजी धुमाळ , अनुप भन्साळी, राम भाले, सेवकराम जाधव, बालाभाई पठाण, श्रीमती तोष्णीवाल मॅडम, रोडे सर यावेळी उपस्थित होते.
या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्लास्टिक मुक्तीचा संदेश सर्वांना देण्यात आला. प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवून प्लास्टिक निर्मूलन करण्यासाठी, प्लास्टिक चा समूळ नाश करण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेचे दूत आणि स्वच्छतेचे प्रेरक हे कार्य करण्याचा निश्चय केला.
तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती गीतांचे गायन केले. तसेच भाषणेही केली. अनेक क्रांतीकारकांना, देशभक्तांना स्मरण म्हणून विद्यार्थी म.गांधी , सुभाषचंद्र बोस , वि.दा. सावरकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुष तसेच क्रांतिकारकांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित " बलिदान देशासाठी " हि नाटिका सादर केली. तसेच देश रंगीला रंगीला या गीतावर नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रावळ मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती तांदळे मॅडम यांनी केले. यावेळी  शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , पालक, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment