तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 August 2018

परभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म

प्रतिनिधी
परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी या बाळाला सुखरूप जगात आणले, मात्र त्याची प्रकृती नाजूक असून त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले होते मात्र हे बाळ आता दगावले असल्याची माहीती प्राप्त झाली आहे

    या बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचे सविता बोचरे असे नाव असून ती मानवत तालुक्यातील पिंपरा या गावाची रहिवासी आहे. तिच्या पोटात कळ येत असल्याने घरच्यांनी तिला प्रथम सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथून तिला परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.  

  दरम्यान, 'अशी केस लाखात एखादी असते. याला (Sirenomelia) वैकल्पिकरित्या मरमेड सिंड्रोम म्हणून ओळखले जाते, ही एक दुर्मिळ जन्मजात विकृती आहे. ज्यामध्ये पाय एकत्र केले जातात. त्यांना एक मत्स्यालयाची शेपूट दिसू लागते, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. कालिदास चौधरी यांनी दिली. तसेच बाळाच्या आईने गरोदरपणातील नऊ महिने एकदाही सोनोग्राफी केलेली नाही, ज्यामुळं हा प्रकार लक्ष्यात आलेला नव्हता. ही महिला थेट आज, शनिवारी दुपारी 12 वाजता रुग्णालयात दाखल झाली होती. तिची तपासणी केली असता, आम्ही परिस्थिती पाहून तात्काळ शस्त्रक्रिया (सिजर) करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर असे बाळ जन्माला आल्याचे दिसून आले. या बाळाची प्रकृती नाजूक असून त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का, यासाठी आम्ही त्याची केस नांदेड, औरंगाबाद येथील प्लास्टिक सर्जन कडे पाठवणार आहोत, त्यांच्या सल्ल्याने पुढील पाऊल उचलले जाईल, असेही डॉ. चौधरी यांनी सांगितले होते. मात्र आता आज हे बाळ दगावले असल्याची माहिती प्राप्त होत आहे


No comments:

Post a Comment