तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 September 2018

केंद्रीय कन्या शा.व्य.समितीची निवड


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ येथिल केंद्रीय कन्या शाळेत दि,29 सप्टेंबर 2018 शनिवार रोजी झालेल्या शालेय व्यवस्थापन समिती च्या निवडी मध्ये सदस्या कसबे बाबासाहेब, चोथवे रंजना सुधिर, किरण रमेश स्वामी, कदम अच्युत, आसेफ मुलानी, कराळे अंजली, द्रौपदी मोटे, राजेभाऊ पवार, मीरा लाकडे, कलिंदर रामेश्वर, दळवे उषा, बिराजदार शोभा, यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली तर या सर्व बारा सभासदांनी मिळून मतदान करून किरण रमेश स्वामी यांची 7-5 अशा मतांनी निवड केली तर सौ.बिराजदार शोभा संभाजी यांची एकमताने उपाध्यक्ष म्हणून निवड केली, या निवडी साठी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड,  देशमुख सर, मुंडे सर, व सर्व वर्गाचे वर्ग शिक्षक उपस्थित होते , सर्व प्रथम गायकवाड सर व देशमुख सर यांनी नियम व अटी सांगितल्या नंतर शिवाजी कदम, रविकुमार स्वामी व मौलाना यांनी आपले मनोगत व शाळे संबंधित अडचणी या बद्दल आपले विचार मांडले, ही निवड सर्व पालकांच्या उपस्थितीत सभागृहात व सर्व संमतीने झालेली आहे.यांच्या निवडीचे स्वागत सोनपेठ तालुका मराठी पत्रकार परीषद अध्यक्ष बाबासाहेब गर्जे, विविध समाज संघटना, विविध मित्र मंडळ, विविध राजकिय पक्ष पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते आदिंकडुन शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.

कानळद येथील निकृष्ट तसेच अपूर्ण कामांची चौकशी करण्याची मागणी


निफाड(प्रतिनिधी कुष्णा जाधव)-कानळद येथे १४ व्या वित्त आयोगातून अंदाजे १ लाख ३७ हजार रुपये रक्कम असलेल्या बसस्टँड जवळील तसेच १४ व्या वित्त आयोगातून मारुती मंदीराजवळ नियोजित असलेल्या जलकुंभांची कामे अपूर्णावस्थेत ठेऊन ठेकेदार गायब आहे.या जलकुंभासाठी अवघ्या अडीच फुटाचा खड्डा खोदून घाई घाईत काम करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न होता मात्र येथील सुजाण नागरिक आप्पासाहेब पारखे यांनी हा प्रयत्न उधळून लावला व ठेकेदारास एस्टीमेटनुसार खड्डा खोदण्यास भाग पाडले.ठेकेदाराने खड्डा खोदला पण एस्टीमेट नुसार काम करणे जीवावर आले व संबंधित ठेकेदार काम तसेच अपूर्ण ठेऊन गायब झाला आहे.हा खड्डा मद्यवर्ती ठिकाणी असून त्यात पाणी साचून डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या कामासाठी आणलेली वाळू रस्त्यातच पडून असल्याने अपघातही होत आहेत,तसेच खड्ड्यानजीक असलेला विजेचा पोल पडण्याचा स्थितीत आहे.येथील दलित वस्ती रस्त्याचे काँक्रीटीकरण काम नित्कृष्ठ झाले असून  साईडपट्ट्या ही केल्या नाही.येथील १० हजार लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचे काम अपूर्ण तसेच नित्कृष्ठ असल्याने त्यास गळती लागली आहे.येथील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याऐवजी बेकायदेशीर पद्धतीने नवीन करण्यात आली आहे.येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.याकडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष्य होत असून या सर्व कामांची चौकशी होऊन अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी येथील आप्पासाहेब पारखे प्रसिद्दीस दिलेल्या निवेदनाद्वारे  केली आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन वैज्ञानिक दृष्टीकोन समितीचा भव्य दिव्य बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर

३० सप्टेंबर -अंधश्रद्धा निर्मुलन वैज्ञानिक दृष्टीकोन समिती मार्फत आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ आज रोजी मालेगाव येथील अरोमा थिएटर येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता अजय बिरारी,थोर साहित्यिक रंजन खरोटे,प्रा.अशोक शिंदे, किर्तनकार रावसाहेब राऊळ,भाजपा विधानसभा निरिक्षक आण्णा सावंत, आदर्श शेतकरी युवराज देवरे,चंद्रशेखर देवरे,अहिराणी साहित्यिक रमेश बोरसे, चिमटाकार मिलिंद धोदरे,सल्लागार डॉ. रवी अहिरे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शांताराम मगर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पुजनाने झाली.नंतर फिल्म पार्श्वगायिका प्रांजल बिरारी नेवासेकर यांच्या सुमधूर आवाजात गीतगायन करण्यात आले.
प्रस्तावनेत अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक द्रुष्टीकोन प्रबोधन समितीचे राज्यअध्यक्ष तानाजी शिंदे यांनी *दगडात देव न पाहता माणसात देव पहा* असे आवाहन केले.
      काव्य स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ४१९ कवींनी *अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टीकोन* या विषयावर कविता पाठवल्या होत्या. त्यापैकी २० कवींचा सत्कार करण्यात आला. यात
पुरस्कार प्राप्त कवी व कविता पुढील प्रमाणे....
१)अरुण झगडकर,चंद्रपुर(प्रथम)
२)सावित्री कांबळे पुणे (द्वितिय )
   ललिता ठुबे,औरंगाबाद(द्वितीय)
३)शैलेष उकरंडे,सोलापूर(तृतीय)
४)निलीमा आष्टिकर मुर्तीजापुर(चतुर्थ)
५)मृणाल घाटे,पुणे (पाचवे)
अनघा पतके,खंडाळा (पाचवे)
*उत्तेजनार्थ*
डॉ.रविंद्र वेदपाठक
विजया पाटील,नवापुर
विजय सातपुते,पुणे
काशिनाथ महाजन,नाशिक
सचिन बागुल,वाशिंद
डॉ संजय संघवी,धुळे
रामभाऊ बैसाणे,धुळे
देवदत्त बोरसे,नामपुर
रामकृष्ण पाटील,डहाणू
विक्रम शिंदे,वेळू ,सातारा
जनार्दन भोये,हट्टीपाडा,पेठ
सागर शेटे,अहमदनगर
भरत गावडे,बेळगाव
डॉ.जितेंद्र देसले,औरंगाबाद,
सुरेश तायडे,मलकापुर
राकेश चौहान ,सिंधुदुर्ग
अपर्णा परळकर,मुंबई
          या कवींचा स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कवींनी आपल्या पुरस्कार प्राप्त कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाला औरंगाबाद जिल्हाध्यक्ष शांताराम मगर उपस्थित होते कार्यक्रमात लेखक रंजन खरोटे यांचे उस्तरवारची कहाणी हे पुस्तक ही सर्व पुरस्कारार्थींना भेट देण्यात आले. अभिनेते अजय बिरारी यांनी  यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजना बद्दल अध्यक्ष तानाजी शिंदे यांचे अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रशेखर देवरे,युवराज देवरे,पोखरीचे भाऊलाल देवरे,संदिप भाऊ सत्यम शिंदे व  समितीच्या सचिव श्रीमती रत्ना शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली. व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.7

भोकरदन मध्ये छुप्या पद्धतीने कत्तलखाने सुरूच...!

आर्थिक अडचणीमुळे पशुधन कत्तलखोरांच्या दावणीला.

पोलिसांनी गस्त घालण्याची गरज : नागरिकांची मागणी

गणेश एन. सोळुंके (भोकरदन ग्रामीण)
--------------------------------
गेल्या काही महिन्यांपासून भोकरदन मध्ये छुप्या पद्धतीने जनावरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याचे सर्वश्रुत असून सध्याच्या परिस्थितीत पशुधन सांभाळत असताना शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून अनेक जण पैशा अभावी आपले पशुधन मोठ्या प्रमाणावर अल्पदरात कत्तल  खोरांना विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान जवळपास दोन महिन्यांमध्ये कत्तलखान्याकडे जाणाऱ्या शेकडो जनावरांचे वाहन पोलिसांनी पकडले. त्या जनावरांना पालनपोषणासाठी गोशाळेकडे रवाना केले. कत्तल खोरांवर याचा काहीच परिणाम झालेला दिसून येत नसून ते बिनबोभाटपणे शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांना कमी पैसे देऊन त्यांचे पशुधन विकत घेऊन दिवसा ढवळ्या छुप्या पद्धतीने कत्तल करीत आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे शहराच्या पुर्व दिशेला असलेल्या जुन्या न्यू हायस्कूल शाळेच्या इमारतीच्या पाठीमागे तसेच तेथे जवळपास असलेल्या ठिकाणी सकाळी चार वाजेच्या दरम्यान हे कत्तलखोर जनावरांची कत्तल करीत असल्याचे समजते. मात्र याकडे कुठलीही सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते अथवा विविध पक्षांचे पदाधिकारी हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्यामुळे या कत्तलखोरांना मोठे अभय मिळत आहे.

पोलिसांनी गस्त घालण्याची गरज : दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून छुप्या पद्धतीने सुरू असलेले कत्तलखाने कुठे आहे हे सांगण्यासाठी कुणीही समोर येत नसून यापुढे पोलिसांनीच सदर कत्तलखोरांचा पाठलाग करून व गस्त देऊन त्यांचा पर्दाफाश करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

ना. पंकजाताई मुंडे यांची परळीत राजकीय खलबतं ; आठ तास चालली बैठक

परळी दि. ३० – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज परळीत बैठक घेवून बरीच राजकीय खलबतं केली. सुमारे आठ तास चाललेल्या या बैठकीत जिल्हयाच्या खासदारांसह भाजपचे सर्व आमदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासह महायुतीचे सर्व सभापती उपस्थित होते. विशेष म्हणजे युवा नेते राजेंद्र मस्केही यावेळी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगाने घडामोडी घडत आहेत. विविध पक्ष, संघटनांचे मेळावे व राजकीय बैठकांनी वातावरण ढवळून निघाले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या चाणाक्ष रणनितीची राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ना. पंकजाताई मुंडे गेल्या तीन दिवसांपासून परळीत तळ ठोकून आहेत. विविध कार्यक्रमा बरोबरच आज त्यांनी आ. आर. टी. देशमुख यांच्या परळी येथील निवासस्थानी बैठक घेवून बरीच राजकीय खलबतं केली. आगामी निवडणूकीची रणनिती व पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर त्यांनी चर्चा केली.

जिल्हा परिषदेच्या सभापतींची हजेरी

या बैठकीस खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, आ. आर. टी. देशमुख, आ.सुरेश धस आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे, राजेंद्र मस्के, गोविंद केंद्रे भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हा परिषदेचे सभापती राजेसाहेब देशमुख, युध्दजित पंडित,उध्दव दरेकर, संतोष हंगे, स्वप्नील गलधर, सुभाष धस आदी उपस्थित होते. बैठकीत इतरही अनेक बाबतीत चर्चा झाली परंतु त्याचा अधिक तपशील मिळू शकला नाही.

परळीत एक खासदार दोन आमदार असतांना शेतकरी परेशान ; पीक विमा व बोंड आळीचे अनुदान आठ

दिवसात वाटप करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा-भास्कर ढाकणे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील पीक विमा , बोंड आळीचे अनुदानाचे पैसे आठ दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा बीड  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भास्कर ढाकणे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात दिला आहे.
      याबाबत दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात ढाकणे म्हणाले की, परळीत दोन आमदार एक खासदार तरीही परळीतील शेतकरी पीक विमा व कापसावर पडलेल्या बोंड आळीच्या अनुदानापासुन वंचित राहिले आहेत. सध्या दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पहिलेच शेतकरी परेशान झाला आहे. त्यातच असे की, अनुदान मंजूर असलेले मिळत नाही.
मागच्या वर्षी भरलेला विमा आद्याप मिळाला नाही. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये भरलेल्या कांहीं प्रमाणातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. मात्र बीड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने आद्याप वाटप केलेले नाही. त्यामुळे शेतकरी मोठय़ा संकटात सापडला आहे.  परळीत दोन आमदार ऐक खासदार आहे यानी जर मनावर घेतले तर शेतकऱ्यांना ततकाळ वीमा मिळेल मात्र शेतकऱ्यांचा फक्त वापर करून घेतला आहे. आज खरच केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे मात्र मुंडे साहेब नाहीत साहेब आसते तर आजवर शेतकऱ्यांना वीमा व आणिक नविन योजना शेतकऱ्यांना लाभ मिळाला असता. आतापर्यंत शेतकऱ्यांना कुठल्याही योजना शेतकऱ्यांन पर्यंत यायच्या आगोदरच लाटल्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या  नावावर आणि शेतकरयाचया जीवावर सत्तेत  आले मात्र हे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही शेतकऱ्यांना कुठले योजना नाही त्यामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात संकटात सापडला आहे.
          याला म्हणतात सतेसाटी सतराशे साट शेतकऱ्यांन साठी  ऐकच नाव होते ऐकच लोकनेता नेता होऊन गेले आहेत. राष्ट्रीय बॅकेमध्ये विमा वाटप करण्यात आला आहे. मग बीड जिल्हा बँक मध्ये का वाटप करण्यात येत नाही का या मागे मोठे राजकीय षडयंत्र आहे. असा घणघणाती आरोप नाव न घेता ढाकणे यांनी लगावला आहे. 
       पिक विमा कंपनीला संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बँकेने जो डाटा आमच्या कडे पाठवला आहे तो संपूर्ण चुकीचा पाठवला होता. असे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  सारडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यात बँकेची कांहीच चुकीचे नाही तर कांही शेतकरयनि बॅके मध्ये विमा भरून चुक झाली का कारण आधीच सरकारी बॅका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत व जे काही देत आहेत ते तीन ते चार महिन्यांच्या पुढे तारीख देत आहेत. यामुळे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे आधीच पाऊस पडत नाही बॅक कर्ज देण्यात असर्मथ त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
तरी शासनाने शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे अन्यथा बीड  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भास्कर ढाकणे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात दिला आहे.

शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेची उद्या परळीत महत्वपूर्ण बैठक


आ.विनायकराव मेटे संस्थापक असलेल्या शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेची महत्वपूर्ण बैठक उद्या सोमवार, दि.01 ऑक्टोबर रोजी परळीत होत असल्याची माहीती शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष तुळशिराम पवार यांनी दिली आहे.

उद्या दि.01 ऑक्टोबर रोजी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेची बैठक सकाळी 11 वाजता चेंबरी विश्रामगृह येथे होत आहे. या बैठकीत अनेक विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. संघटनेची आगामी काळातील दिशा आणि संघटन विस्तार यासह अनेक बाबींचा यामध्ये अंतर्भाव असणार आहे. तरी शिवसंग्रामचे परळी  मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या महत्वपूर्ण बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष तुळशिराम पवार यांनी केले आहे.

कानळद येथील निकृष्ट तसेच अपूर्ण कामांची चौकशी करण्याची मागणी


निफाड(प्रतिनिधी कुष्णा जाधव)-कानळद येथे १४ व्या वित्त आयोगातून अंदाजे १ लाख ३७ हजार रुपये रक्कम असलेल्या बसस्टँड जवळील तसेच १४ व्या वित्त आयोगातून मारुती मंदीराजवळ नियोजित असलेल्या जलकुंभांची कामे अपूर्णावस्थेत ठेऊन ठेकेदार गायब आहे.या जलकुंभासाठी अवघ्या अडीच फुटाचा खड्डा खोदून घाई घाईत काम करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न होता मात्र येथील सुजाण नागरिक आप्पासाहेब पारखे यांनी हा प्रयत्न उधळून लावला व ठेकेदारास एस्टीमेटनुसार खड्डा खोदण्यास भाग पाडले.ठेकेदाराने खड्डा खोदला पण एस्टीमेट नुसार काम करणे जीवावर आले व संबंधित ठेकेदार काम तसेच अपूर्ण ठेऊन गायब झाला आहे.हा खड्डा मद्यवर्ती ठिकाणी असून त्यात पाणी साचून डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या कामासाठी आणलेली वाळू रस्त्यातच पडून असल्याने अपघातही होत आहेत,तसेच खड्ड्यानजीक असलेला विजेचा पोल पडण्याचा स्थितीत आहे.येथील दलित वस्ती रस्त्याचे काँक्रीटीकरण काम नित्कृष्ठ झाले असून  साईडपट्ट्या ही केल्या नाही.येथील १० हजार लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचे काम अपूर्ण तसेच नित्कृष्ठ असल्याने त्यास गळती लागली आहे.येथील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याऐवजी बेकायदेशीर पद्धतीने नवीन करण्यात आली आहे.येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.याकडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष्य होत असून या सर्व कामांची चौकशी होऊन अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी येथील आप्पासाहेब पारखे प्रसिद्दीस दिलेल्या निवेदनाद्वारे  केली आहे.

मंगरुळपीर नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय यत्रंणा असमर्थ

आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते करणार उपोषण

तहसीलदारांना लेखी निवेदन

मंगरुळपीर -शहरातील नागरीकाच्या विवीध समस्या सोडविण्यासाठी शासकीय यत्रंणा असमर्थ ठरत असल्याने नागरीकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे या समस्याचे तात्काळ निवारण करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यानी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे मागण्या पुर्ण न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे
निवेदनाचा आशय असा की नागरीकाच्या समस्या लक्षात घेऊन विवीध प्रश्नासाठी व मागण्यासाठी शासकीय व प्रशासकीय स्तरावर गेली दीड वर्षापासुन निवेदन देत आहे मात्र या निवेदनाची दखल न घेता केराची टोपली दाखविल्या जात आहे त्यामुळे शासनाच्याप्रति जनतेच्या मनात तीव्र असंतोष खदखदत आहे शासन प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतुन जागे करण्याकरीता आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला असुन या निवेदनात नमुद केलेल्या मागण्या मंगरुळपीर झोपडपट्टी धारकांना कायमस्वरुपी पट्टे देण्यात यावे,संजय गांधी लाभार्य्थाचे अनुदान वाढविणे,ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व मुबलक औषधीसाठा उपलब्ध करुन द्यावा,अतिक्रमण धारकांना बाजारातील हद्दीमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी,शेतकर्‍याच्या मालाला हमीभाव द्यावा,महाराष्र्टाला विजेचे अवाजवी दर कमी करावे,तसेच शहरातील प्रत्येक चौकात स्री व पुरूषाकरीता शौचालय बांधुन द्यावे अशा मागण्या केल्या असुन या निवेदना अजहर खान,अलीम शितलवाले ,सुरेश सातरोटे,अनिल कावळे,श्रीकृष्ण चेके,आरीफ खान,जुबेर अहमद याच्या स्वाक्षर्‍या आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

रिसोड तालुक्यातील वाकद येथे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी सात्वरपर भेट

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड

रिसोड प्रतिनिधी :- तालुक्यातील वाकद येथे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देवुन मापारी कुटुंबीयांचे सात्वन केले आहे
भाजपा पदाधिकारी नामदेव हुंबाड यांचे जावाई किशोर मापारी यांचे अपघातात नुकतेच निधन झाले होते आ.पाटणी यांच्या मापारी यांच्या वाकद स्थित निवासस्थानी जावुन भेट दिली व कुटुंबी यांचे विचारपूस करुन सात्वन केले या प्रसंगी भाजपा नेते भागवान गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष लखन सिंह ठाकुर भाजपा युवा मोर्चा जिल्हा सुनिल पाटील युवा मोर्चा चे सरचिटणीस सुनिल कांयदे नामदेव हुंबाड माजी नगर अध्यक्ष किरण क्षीरसागर भाजपा तालुका उपाध्यक्ष गजानन कोकाटे साहेबराव इप्पर भारत कोकाटे दिलीप देशमुख सुनिल धुत अशोक सानप अमोल लोथे सह गावातील  प्रतिष्ठातीत नागरिक उपस्थित होते
रिसोड येथे भेटे शहारातील अष्टभुजा चौकातील रहिवासी तथा सेवा निवृत्ती शिक्षक विनायकराव पांडे यांचे अपघातात नुकतेच निधन झालं होते यांच्या निवासस्थानी आ.पाटणी यांनी भेट दिली व सात्वन केले

सुदाम गोरे यांचे निधन

सेलू!प्रतिनिधी

तालुक्यातील राधे -धामणगाव येथील शेतकरी सुदामराव पांडुरंगराव गोरे वय ७२यांचे शनिवार दिनांक २९
सप्टेंबर रोजी दुपारी
१२-०५ 
वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी ७-३० राधे धामणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे राधे धामणगाव येथील प्रगतिशील शेतकरी विनायक गोरे यांचे ते वडील होत.

विकासकन्येच्या हस्ते परळीत झाला संगणकीकृत पशूगणनेचा राज्यस्तरीय शुभारंभ

समाजातील अपप्रवृत्तीचा 'ट्युमर' वेळीच काढून टाका - ना. पंकजाताई मुंडेंचे आवाहन

मुंडे साहेबांच्या गौरवासाठी त्यांच्या कर्मभूमीतून योजनेचा शुभारंभ - ना. महादेव जानकर

परळी दि. ३० -------  माणसाची ओळख ही त्याच्या कर्तृत्वाने निर्माण झाली पाहिजे. आज समाजात निर्माण होत असलेले जातीभेद हे मानवनिर्मित आहेत. पशूंमध्ये कुठलीही भेदाभेद नसतो. जातीभेद व अपप्रवृत्तीचा समुळ नायनाट करण्यासाठी समाजात पसरलेला ' ट्युमर' वेळीच काढून टाकावा नाही तर रोग प्रवृत्ती वाढत जाईल असे सांगून  शेतक-यांनी पशूपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून केल्यास तो अधिक फायदेशीर ठरेल असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितले. दरम्यान, लोकनेते मुंडे साहेबांमुळे परळीचे नांव देशाच्या नकाशावर आले म्हणून योजनेचा शुभारंभ त्यांच्या कर्मभूमीतून आम्ही केला आहे असे ना. महादेव जानकर यावेळी म्हणाले.

   पशूसंवर्धन विभागाच्या वतीने प्रथम संगणकीकृत विसाव्या पशूगणनेचा शुभारंभ ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात मोठ्या थाटात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, सह आयुक्त डॉ सुनील राऊतमारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.

  पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, पूर्वीपासूनच बीड जिल्हा आणि परळी हे देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ  मोठं मोठे नेते येथूनच करतात कारण हा जिल्हा सर्व सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे. आज माझे बाबा ज्या ठिकाणाहून मला बघत असतील त्या ठिकाणाहून त्यांची ही देखील परंपरा कायम ठेवल्याबद्दल त्यांना माझा अभिमान वाटत असेल असे त्या म्हणाल्या.

    महादेव जानकर यांच्या भाषणाचा संदर्भ देवून त्या म्हणाल्या की,     राज्यस्तरीय पशुगणनेचा शुभारंभ परळी येथून करण्यात आला ही अभिमानाची गोष्ट आहे.  सर्वसामान्य माणसाला, गरिबाला न्याय देण्याचे काम करणारा मुंडे साहेबांसारखा सुपुत्र या परळीने देशाला दिला आणि मलाही याच शहराने सत्ता दिली म्हणूनच राज्याच्या योजनेचा शुभारंभ या ठिकाणाहून करतांना मला मंनस्वी आनंद झाला आहे. ना.महादेव जानकर याच्या नेतृत्वाखाली पशु संवर्धन खात्याने खुप चांगले काम केले आहे. संगणकीकृत पशुगणनेमुळे आपल्याकडे असणारं पशुधन, त्यांना असणारे आजार आपल्याला माहीत होतील व त्यावर उपाय शोधणे सोपे होईल आणि महत्वाचे म्हणजे यासाठी एखादी योजना करणे सोपे होणार आहे. यासाठी आपल्या कडील पशुधनाची नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

जातीभेदाचा ट्युमर काढा
------------------------------
पशूंची गणना करणे सोपे आहे त्यांचा रंग रूपावरून ती सहज शक्य आहे पण आज समाजात जे जाती भेदभाव वाढले आहेत ते कसे कमी हे ही पाहणे गरजेचे झाले आहे. ज्या प्रमाणे जास्त दुध देणाऱ्या पशूंची त्याच्या गुणामुळे ओळख होते त्याच प्रमाणे माणसाची ओळख ही त्याच्या जातीवरून नाही तर त्याच्या कर्माने,कर्तृत्वाने झाली पाहिजे असे त्या म्हणाल्या. जनावरांमध्ये भेदभाव नाही माणसांकडे मात्र तो असल्याची खंत व्यक्त केली. शरीरात एखादा रोग झाला तर त्यावर औषधोपचार केला जातो. जर तो बरा झाला नाही तर  डॉक्टर शरीरातून तो भाग काढून टाकतात त्यानंतरच शरीराला आराम मिळतो. आज समाजात असणारा भेदाभेद, जाती पातीचा ट्युमर वेळीच काढण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.  राजकारणात मी तुरटी प्रमाणे काम करत आहे. तुरटी पाण्यात फिरवली की गाळ खाली बसतो आणि वरती स्वच्छ पाणी जमा होते. आज सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत विविध योजना विकास पोहचवण्याचे काम सुरू आहे. महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना बळ, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत येणाऱ्या काळात पशुसंवर्धन आणि ग्रामविकास खात्याचा माध्यमातून एक चांगली संयुक्त योजना करणार असल्याचे त्या म्हणाल्या. मुंडे साहेबानी सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात काम करत आहे. तुमचे आशीर्वाद कायम ठेवा असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री पशुपालक योजना कार्यान्वित करणार - ना. जानकर
-------------------
सर्व पशुपालकांनी पशुगणना करून घ्यावी. हे खाते भारतात सर्वात संपन्न आणि पहिल्या क्रमांकाचे खाते आहे. अनेक पशुपालकांनी याच व्यवसायाच्या बळावर आपल्या मुलांना अधिकारी केले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आम्ही परळीत घ्यायचा ठरवला आहे. परळी हे राज्यात अनेक गोष्टींचे केंद्र झाले आहे, तसे भविष्यातील देशाच्या खूप मोठ्या लोकनेत्यांचेही ते केंद्र असणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी परळीचे नाव देशाच्या पटलावर आणले आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही परळीत घेत आहोत. येत्या काळातील योजनांची आखणी करायची असेल तर पशुगणना होणे आवश्यक आहे. त्यामुळे पशुपालकांनी गणना करून घेणे आवश्यक आहे. येत्या काळात मुख्यमंत्री पशुपालक योजना कार्यान्वित करणार असल्याचे ना. महादेव जानकर यावेळी म्हणाले.

  प्रारंभी ना. पंकजाताई मुंडे व जानकर यांनी गोमातेची पूजा करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. धारूर येथील राज्यातील पहिल्या शेळी पालक उत्पादक कंपनीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक  पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले. याप्रसंगी जिल्हयातील पशूधन विकास अधिका-यांचा सत्कार करण्यात आला.