तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 10 September 2018

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली

किरण घुंबरे पाटील

परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उमेदवार देऊन सेने विरोधात सर्व शक्ती पणाला लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून पुढची रणनिती कशी असेल या वर सद्या गुप्त खलबते सर्वच राजकीय पक्षात सुरू असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

परभणी लोकसभा मतदार संघात १९५७ ते १९७७ पर्यत काँग्रेसच्या खासदारानेच प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर १९७७ मध्ये या मतदार संघात शेकापचे शेषराव देशमुख खासदार म्हणून विजयी झाले. परंतु १९८० पासून काँग्रेसच्या खासदारांची परंपरा सुरु झाली सलग दोन वेळा काँग्रेसचे खासदार लोणीकर या मतदार संघात विजयी झाले. त्यानंतर ज्वलंत हिंदुत्वाचा नारा देऊन मराठवाड्याच्या राजकारणात प्रवेश केलेल्या शिवसेनेला या मतदार संघात अशोक देशमुख यश आले. हे यश सलग तीन कार्यकाळ अबाधित होते. मात्र १२  व्या लोकसभेत या मतदार संघात मतांच्या एकिकरणाने मुळे काँग्रेस (आय) चे उमेदवार वरपुडकर विजयी झाले. परंतू परत १३ व्या लोकसभे जाधव,रेंगे, दुधगावकर, पासून ते आज तागायत या मतदार संघात शिवसेनेचे खासदार विजयी होत आलेले आहेत. 

काही महीण्यांचा अपवाद वगळता सलग ३० वर्षा पासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेनेला शह देण्या साठी भाजप सह आघाडीचे नेते सज्ज आहेत. परंतू शिवसेनेचा प्रतिस्पर्धी म्हणून समोर येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस कडे अद्यापही इच्छुक उमेदवारांचीच वानवा आहे. शिवसेने कडून विद्यमान खासदार संजय जाधव यांची उमेदवारी पक्की मानली जात असली तरी आ राहूल पाटील, माजी आ हरिभाऊ लहाणे हे सुद्धा संधीची वाट पाहात असल्याची चर्चा राजकीय गोटातून होत आहे. विद्यमान खासदारांनाच लोकसभेची उमेदवारी देणार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे जाहीर करणे म्हणजेच खा जाधवांनाच पुन्हा संधी दिली जाईल असे मानले जात आहे.

खा संजय जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात सामाजिक कार्याला मोठा हातभार लावला आहे यात आठशे वर विवाह सामुदाईक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी केले आहेत एकाच वेळी ३३३ तेहतीस विवाह पार पाडले होते. त्याच बरेबर गरजूला वेळोवळी ममदत आणि धार्मिकतेची आवड असल्याने नवरात्रोत्सव,दहीहंडी, सांप्रदाईक कार्यक्रमात सहभाग घेऊन सत्तेत असतांनाही जनतेच्या समस्या सोडवण्या साठी ते अनेकदा रस्त्यावर उतरले आहेत. खा संजय जाधव यांच टायमिंग अगदी योग्य असतं असे सेना कार्यकर्ते सांगतात

भाजपाची तयारी जोरात

भारतीय जनता पक्षा कडून पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे इच्छुक होते. त्या साठीच त्यांनी गेल्या दोन वर्षा पासून परभणी लोकसभा मतदार संघात लक्ष केंद्रीत केले होते. सातत्याने जिल्ह्यातील विकास कामाची पाहणी करणे, जनसंपर्क वाढविणे हे काम लोणीकरांनी सुरु केले होते. राज्य शासनाच्या समाधान शिबीराच्या माध्यमातूनही त्यांनी परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पिंचून काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपच्या या दोन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मंत्री लोणीकरांनी समाधान शिबीराचा समारोप देखील केला होता. त्यामुळे बबनराव परभणी लोकसभा लढविणारच हे निश्‍चित मानले जात होते.

लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना युती होईल म्हणून ही जागा शिवसेनाच लढेल असे मंत्री ना बबनराव लोणीकर यांनी चर्चे दरम्यान तेजन्यूजहेडलाईन्स ला सांगितले होते मात्र तसे न झाल्यास भाजपाची निवडणुक लढण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले आहेत. ते स्वत:एैवजी मुलगा राहूल लोणीकर यांना येथून लोकसभेला उभे करतील असे राजकिय जाणकारांचे मत आहे.

या शिवाय मेघनाताई साकोरे/बोर्डीकर या ही लोकसभे साठी उत्सूक असून मागिल काही महिण्यां पासून गावगाड्यातील समाजकार्यात त्या अवार्जून उपस्थिती लावत नागरीकांशी सुसंवाद साधत आहेत. अनेक सामाजिक उपक्रम राबवत ही आहेत. या शिवाय सुरेश नागरे आनंद भरोसे,प्रफुल पाटील यांचे नावे ही चर्चीली जात आहेत.

शिवसेनेला शह देण्या साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार हे जवळपास निश्चित मानले जाते तसे सुत्रचं वरिष्ठ पातळीवर ठरले आहेत. परभणीची जागा आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल हे ही निश्चित मानले जात आहे. काही महिण्या पुर्वी म्हणजेच विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी आधी काँग्रेस ने राकाँला म्हणजेच आ दुर्रांनी यांना मदत करायची त्या बदल्यात राकाँने वरपुडकरांना पाथरी विधानसभा निवडणुकीत मदत करायची आणि लोकसभेला राजेश विटेकरांना उमेदवारी देऊन सर्वांनी एकदिलाने काम करून निवडणुक जिंकायची असा फार्मुला ठरवत आ बाबाजानी दुर्रानी आणि माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर यांचे सख्य जुळले होते.

२०१४ च्या निवडणुकी आधी पासून या दोघां मधील राजकीय वैमनस्य सर्वश्रृत होता मात्र राजकारणात कायम शत्रू आणि मित्र नसतात हे या कालावधीत दिसून आले.याच वेळी परिस्थिती बदलली वरीष्ठ पातळीवर हालचाली होत जागेंच्या आदला बदली झ्याल्या आणि विधानपरिषदेची एैनवेळी काँग्रेसला उमेदवारी मिळाली. इथे आघाडीची स्थानिकची गणिते चुकली आता मात्र माजी मंत्री वरपुडकर हे राकाँचे लोकसभेला काम करणार का? असा प्रश्न जनतेत आणि राजकीय गोटात चर्चीला जातोय याचे कारण कथनी आणि करणीत फरक असल्याचा दाखला ही मंडळी देतात त्याच बरोबर खा संजय जाधव यांच्या बरोबर वरपुडकरांचे असलेले सख्य ही उदाहरणा दाखल सांगितले जाते.

या ठिकाणी राकाँ कडून जर राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली गेली. सेना-भाजपा स्वतंत्र निवडणुक लढवल्यास आणि या विरोधात आघाडीचा उमेदवार म्हणून राजेश विटेकरांना उमेदवारी दिली गेली तर ते ही उमेदवारी घेऊन निवडणुक लढणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण चाळीस वर्ष विटेकर- वरपुडपुडकर घरान्याचे राजकीय वैर सर्व जिल्ह्याला परिचित आहे. त्या मुळे राजेश विटेकरांनी जिल्हा बँक निवडुकीत स्वत:चे साडू यांना डावलून दोन पावले मागे येत वरपुडकरांना मदत केली आहे. हे दुरदृष्टी ठेऊनच उचलेलं पाऊल होते. लोकसभा निवडणुकीत घातपात झाल्यास या तरूण नेतृत्वाला कायम स्वरूपी राजकारण सोडण्याची वेळ येऊ शकते. त्या एैवजी जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर मात्र राजेश विटेकर हे लोकसभा निवणुक लढण्यास उत्सूक राहातील कारण या वेळी क्रॉस व्होटींग करण्याचे धाडस होणार नाही. यात दोन्ही जागांना फायदा होऊ शकतो. राजेश विटेकर यांची स्वच्छ प्रतिमा, युवकां मध्ये त्यांच्या विषयी असले मत याच बरोबर सोनपेठ,पाथरी मानवत, गंगाखेड, पालम या भागात विटेकरांचे वैयक्तीक चांगले संबध आणि नातेवाईक  आहेत या सह घनसावंगीत विरोधकांचे जावई असल्याचा फायदा विटेकर मिळऊ शकतात.

त्याच प्रमाणे आ दुर्रानी, आ भांबळे, आ केंद्रे, माजी मंत्री आ राजेश टोपे ही दिग्गज मंडळी सोबत राहीली आणि काँग्रेस पदाधिकारी जर सोबत राहीलेतर १२ लोकसभेत जसा वरपुडकरांनी विजय मिळवला तसा विजय राजेश विटेकर राकाँला मिळऊन देऊ शकतात. मराठा विरुद्ध मराठा ही लढत महत्वाची राहाणार आहे. राजेश विटेकरां साठी सोनपेठ तालुक्यात विरोधकां मध्ये ही सहानुभूती व्यक्त होते या ठिकाणी ते सर्वाधिक मताधिक्य घेऊ शकतात

तसेच पाथरी तालुक्यात मोदी लाटेत आ दुर्रांनी यांनी राकाँ उमेदवाराला दोन शेकड्याची निसटती आघाडी मिळऊन दिली होती. आता तर जवळपास चाळीस ग्रामपंचायती,३२ पैकी २८ सहकारी संस्था, सात पंचायत समिती,आणि तीन जिल्हापरिषद सदस्य आणि पाथरी शहरात तर विरोधकच ठेवलेला नसल्याने हे दोन तालुके निर्णयाक आघाडी देतील परंतु वरपुडकरांचा विश्वास जर विटेकरांना आला तर ते लोकसभा निवडणुक लढतील या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी च्या सर्वांनी एकदिलाने काम केले तर यात विटेकर यशस्वी होतील असा विश्वास राजकीय विश्लेशक व्यक्त करतात.

आ दुर्रांनी आणि माजी मंत्री वरपुडकरांचे सख्य जुळलेच आहे तर वरपुडकरांनी परभणी लोकसभा निवडणुक लढऊन विधानसभा राजेश विटेकरांच्या गळ्यात टाकली तर हे गणित आघाडी साठी फायद्याचे ठरू शकते. कारण कुठल्याही परिस्थितीत निवडणुक जिंकायचीच अशा इर्शेने सद्या आ मोहनराव फड हे निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत. राजेश विटेकर आणि आ बाबाजानी दुर्रांनी हे दोन्ही नेते वरपुडकरां साठी सारखेच महत्वाचे असणार आहेत.

पुढील संधी मिळावी म्हणून जि प अध्यक्ष पदी राहीलेले विटेकर त्यांच्या वडीलांचा वारसा चालवत आहेत नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा योग्य समन्वय त्यांच्या कडे आहे. शिवाय या वेळी आई साठी सहज मिळणारे जि पचे पद ही त्यांनी आपल्या सहका-यांला दिलं इथेच विटेकरांची राजकारणात सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भुमिका जनमानसांच्या मनात बिंबली गेली आहे. त्या मुळे काही मिळवायच असेल तर छक्के पजांचं राजकारण या पुढे किमान आघाडी साठी तरी घातक ठरेल असे चित्र दिसत आहे. विटेकरांना टाळणे ही आघाडी साठी हिताचे असणार नाही.

प्राचार्य डॉ दळणरांची चर्चा

प्राचार्य डॉ शिवाजीराव दळणर यांनी सेनेला जय महाराष्ट्र केल्या नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील असे सांगितले जाते प्रत्यक्षात डॉ दळणर यांनी अजून तरी कोणतीही भूमिका जाहीर केली नसली तरी ते लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी तेजन्यूजहेडलाईन्स शी बोलतांना सांगितले आहे. पण निवडणुक कोणा कडून लढवणार हे मात्र त्यांनी सांगितले नसले तरी आघाडी कडून आ भांबळे जिंतूर सोडणार नसल्याचे सांगितले जाते.

विटेकरांच अजून काही नाही अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणा हून डॉ दळणर यांना उमेदवारी द्यायची आणि आघाडीने मदत करायची अशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यस्तरा वरील नेत्याने तेजन्यूजहेडलाईन्स शी बोलतांना दिली असून हे सुत्र जुळल्यास धनगर समाज ही आरक्षणा साठी डॉ दळणर यांना साथ देईल असे माणले जात आहे.

प्रत्यक्षात धनगर समाजाच्या एकून मतां मधील किमान तीस टक्के मते ही इतरांना जातील असे राजकीय जाणकार सांगतात. खा राजू शेट्टी आणि आघाडीच्या वरिष्ठ पातळी वरील नेत्यांची जवळीक ,बैठका होत असल्या तरी अजून तसा निर्णय जाहिर ही झालेला नाही.

समिर दुधगावकर इच्छूक?

माजी खा गणेशराव दुधगांवकर यांचे चिरंजीव अमेरीकेत अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण करून (एमएस) भारतात परलेले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे मराठवाडा माजी उपाध्यक्ष समीर दुधगांवकर हे परभणी जिल्ह्यातील युवकां समोर उद्योग, व्यवसाय सुरू करून तरूणांना काम देत बेरोजगारी हटवत जिल्ह्यात मागासलेला विकास करण्याचे व्हिजन देत लोकसभा निवडणुक रिंगणात उतरणार असल्याचे संकेतही मिळाले आहेत.

गावागावात भेटी देऊन सुशिक्षित बेरोजगारांना ते आकर्षीत करत आहेत. गावागावात मेळावे आयोजित करून आपल्या टीम च्या माध्यमातून गेली तीन वर्षा पासून समीर दुधगांवकर जनतेच्या संपर्कात आहेत, सोशल मिडीयातून ही ते लोकांशी संवाद साधत आहेत. परदेशात राहून आलेला हा युवक नवी क्रांती घडवेल असा विश्वास तरूणां मधून व्यक्त ही होतो आहे.मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणुक लढतील हे मात्र त्यांनी ही अजून पर्यंत जाहीर सांगितले नसले तरी त्यांच्या गोटातून या विषयी चर्चा मात्र होत आहेत.

एकूनच शिवसेनेचा बालेकिल्यात सेनेला धोबी पछाड देण्या साठी च्या हालचाली अशा पद्धतीने सुरू असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. यात या वेळी तरुण चेहरे लोकसभा निवडणुकीत दिसतील असे ही मानले जात आहे. चार महिण्या नंतर लेकसभेची धामधूम सुरू होणार आहे. मात्र शिवसेनेची धास्ती सर्वांनाच असणार आहे.2 comments:

  1. परफेक्ट विश्लेषण....

    ReplyDelete
  2. Nice sir,Cool and all condition present. But Only KING MAKER BOSSS ALWAYS....BOSSS..

    ReplyDelete