तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 September 2018

मानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली


प्रतिनिधी

मानवत:  राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

 सध्या झरी ३३ के.व्ही.लाईनचे काम एका खाजगी कंपनी मार्फत केले जात आहे.गुरुवारी दिवसभर दहा -बारा मजूर राष्ट्रीय महामार्गा वर झरी पानंद ओढ्या वरील पुला शेजारी काम करते होते.या ठिकाणी रत्नापूर फिडरची एक विद्युत वाहिनी गेलेली आहे. गुरुवारी दिवस भर तांत्रिक कामा साठी या लाईन वरील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता.सायंकाळी पाचच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. या लाईनला झरी के.व्ही लाईनचा स्पर्श होऊन विद्युत पुरवठा ओढ्यातील पाण्यात उतरला. या वेळी या मार्गाने जाणाऱ्या बालाजी नामदेव चिंचलवार यांच्या ०३ म्हशी आणी १ गाय व दिंगाबर जाधव यांच्या मालकीच्या चार शेळ्या जोराचा विद्युत धक्का लागल्याने  जागेवरच दगावल्या.सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही. घटना स्थळी सहाय्यक निरीक्षक प्रवीण दिनकर,  जमादार आशिष कवठेकर, पशुवैद्यकीय अधिकारी हुसेन चाऊस,डॉ.नितीन वेदपाठक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

No comments:

Post a comment