विश्वनाथ देशमुख सेनगावकर
सेनगाव:-सि.एम.चषक क्रिडा महोत्सव निमित्त हिंगोली विधानसभा अंतर्गत आयुष्यमान भारत क्रिकेटचे खुले सामने दि.5 नोव्हेंबर सोमवार पासुन सकाळी 11 वाजता तोष्णीवाल काँलेजच्या मैदानावर खेळविण्यात येणार असल्याची माहीती भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंडीत तिडके यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आयोजक आ.तानाजीराव मुटकुळे तर सह आयोजक हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर अाहेत.या कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख यांच्या शुभहस्ते होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष इंजि.अभिजीत देशमुख,जि.प.सदस्य कल्पनाताई घोगरे,जिल्हा उपाध्यक्ष सुर्यभान ढेंगळे,तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल,कांतराव कोटकर,शिवाजी मुटकुळे,महेंद्र जैस्वाल,पुरुषोत्तम गडदे,भाजपा युवा तालुकाध्यक्ष विजय डोखळे,कैलास खाडे,अमोल तिडके,महादेव धोतरे आदीसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सामन्याचे प्रथम पारीतोषीक 21 हजार रुपये,व्दितीय 15 हजार रुपये तर तृतीय 11 हजार रुपये असणार आहे.या सामन्याचे संयोजक भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पंडीत तिडके,गजानन उफाड,गजानन घोंगडे हे आहेत.या सामन्यात पंच म्हणुन कुरेशी,अमोल तिडके,प्रताप लोखंडे,महादेव धोतरे आहेत.स्पर्धेत सहभागी होणा-या संघाना विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आँनलाईन नोंदनी करणे आवश्यक आहे.यासाठी WWW.cmchshak.com या संकेतस्थळावर जाऊन दि.4 नोव्हेंबर रविवार पर्यंत नोंदनी करावी.हिंगोली विधानसभा मतदार संघाअंतर्गत येणा-या सर्व क्रिकेट संघानी व क्रिकेट प्रेमींनी या सुर्वण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केला आहे.