तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

19 वर्षा पासून जानेफळ रस्त्याची दैनि अवस्था आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या

प्रयत्नामुळे झाली दुर, तिन कोटी रुपये मंजूर.

वैजापूर -  सुधीर बागुल

तब्बल १९ वर्षापासून खंडाळा जानेफळ रस्त्याची दैन्य अवस्था झाल्याने या मार्गावर वाहने चालवणे  अवघड झाले होते. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत चालकास करावी लागत होती. चक्क चालकही कुठलाच खड्डयांचा विचार न करताना बेकदर वाहन चालवून प्रवाशांचे जीवन धोक्यात टाकत असल्याचा प्रत्यय अनेक वेळा  खंडाळा-जानेफळ रस्त्यावर बघावयास मिळाला.

वैजापुर तालुक्यातील खंडाळा येथे मोठी बाजार पेठ असल्याने येथून जवळच असलेल्या जानेफळ, हिलालपूर, कोरडगाव, निमगाव या गावांचा नेहमी
मोठ्या प्रमाणात संपर्क येतो. यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असल्याने रोज शेकडो प्रवासी विद्यार्थी रोज प्रवास करतात. या रस्त्यावरून अनेक वेळा या परिसरातील लोक प्रतिनिधी ये-जा करतात. परंतु हा मार्ग अनेक वर्षापासून नादुरुस्त असून देखील अद्याप कोणत्याच प्रतिनिधीने या गंभीर समस्येकडे लक्ष दिलेले नसल्याचे चित्र परिसरात बघवयास मिळत होते. याचा सर्वच महत्वाचा त्रास वयोवृद्ध, महिला यांना सहन करावा लागत होता.  या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने महामंडळचे बसचालक या मार्गावर चालवत नसून चक्क नवीन रस्ता शोधून काढला. लकानी काढलेल्या पर्यायी  रस्त्या हा डोंगर लागत असून त्या लगत मोठ मोठे खड्डे आहे. या रस्त्यावर कोणत्याच प्रकारची सुरक्षा नसल्याने मोठा अपघात होण्याची  भिती होती. याकडे वैजापूर तालुक्याचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी  डोंगरथडी भागात अतिमहत्त्वाचा असणारा खंडाळा ते तलवाडा हा १८ कि.मी रस्त्याच्या दुरुस्तीकडे  गांभिर्याने लक्ष देवून त्यासाठी ३ कोटी रुपये मंजूर आणले.  त्यातून खंडाळा ते जानेफळ, खरज, चिकटगावकर, तळवाडा या १८ कि.मी.रस्त्याचे काम सुरु झाले आहे.
रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
जानेफळ येथे रसत्याच्या कामाचा शुभारंभ आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी जि.प.सदस्य अभय पाटील चिकटगावकर, पंढरीनाथ महाराज पगार  यांच्या हस्ते पार पडले. या वेळी रामभाऊ महाराज, संतोष महाराज गायकवाड,कृष्णा स्वामी महाराज, उपअभियंता जे.ई.गुरसुडकर, मारपल्ले, माजी उपसभापती भागिनाथ मगर,  सूरज पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले,  राजेंद्र मगर, उत्तम निकम, रिखब पाटणी,साईनाथ मतसागर,राजेंद्र कऱ्हाळे, प्रेम राजपूत, बापूसाहेब साळुंके,सागर गायकवाड, बंटी मगर, योगेश बोर्डे, महेश बोर्डे, दत्तु कुंदे,आर.के.पाटील, कैलास ठुबे, राजू साळुंके,आनंद निकम,आण्णा चौधरी,मयुर राजपूत, विशाल मतसागर, अनिल सोनवणे,आनिल भोसले,अमोल पाटील बावचे,गणेश चव्हाण, राजेंद्र जानराव, संजय सुर्यवंशी,अविनाश रोकडे,अक्रम पठाण,दादासाहेब गायकवाड, सुनील खांडगौरे,संकेत चुडीवाल, प्रकाश ठुबे, डॉ.राजेंद्र जगदाळे, शेखर जगदाळे, सुरेश अग्रवाल, युसूफ शेख उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानेफळ येथील सरपंच जितेंद्र जगदाळे यांनी केले.

No comments:

Post a Comment