तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 October 2018

लासुर स्टेशन येथे स्थानिक गुन्हे शाखेचा दारू साठ्यावर छापा, 4,04400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त......

गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे दिनांक 08/10/2018 रोजी रात्री 1:30 वाजता परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक जगदीश पांडे,स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद ग्रामीणचे पथक व शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीत लासुर स्टेशन येथे मदन घनश्याम जैस्वाल यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम.एच 20 ए.ए 7199 हिच्यावर अचानक छापा मारला असता सदर वाहनामध्ये 1,04000 /- रुपये किमतीची देशी दारू भिंगरी संत्राचे 30 बॉक्स व विदेशी दारूचा अवैध साठा मिळून आल्याने वाहनासह एकूण 4,04400/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी संजय सुदर्शन जैस्वाल व महिंद्रा पिकअप गाडी चालकाविरुद्ध पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती उज्ज्वला वनकर यांचे मार्गदर्शना खाली परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक जगदीश पांडे,पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक विजय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव, प्रशांत मुंढे, पोह रतन वारे, पोना आशिष जमधडे,रमेश अपसनवाड, पोकॉ रामेश्वर धापसे, कृष्णा आधाट,तेनसिंग राठोड, रवी अंभोरे, अफसर बागवान, लक्ष्मण रोडगे, चालक सफो दिलीप राजपूत, वसंत लटपटे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment