तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

पोलिस कर्मचारी दिलीप गित्ते यांचे क्रिडा स्पर्धेत दैदिप्यमान यश ; 7 खेळात मिळविले प्रविण्य

 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी दिलीप गित्ते यांनी औरंगाबाद येथे सोमवारी झालेल्या जलतरण स्पर्धेत 7 गोल्डमेडल मिळवून दैदिप्यमान यश मिळविले आहे. गित्ते यांनी बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे. पोलीस अधिक्षक कोळकेस साहेब, कोडे साहेब, मेघराजन साहेब, पोलिस उप अधिक्षक हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

    औरंगाबाद येथे सोमवारी  झालेल्या 33 व्या परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा 2018 दि.27 आँक्टोंबर ते 02 नोव्हेंबर दरम्यान चालू आहेत.  या स्पर्धेसाठी औरंगाबाद परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. आज सोमवार दि.29 आँक्टोंबर रोजी एम.जी.एम. स्वमिंग पुल औरंगाबाद येथे पार पडल्या. या जलतरण स्पर्धेत परळी पोलिस ठाण्याचे कर्मचारी दिलीप गित्ते यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होऊन 500 मिटर
फ्रीस्टाईल प्रथम, 50 बटर फ्लाय प्रथम,100 मिटर फ्रीस्टाईल मध्ये प्रथम, 200 मिटर आय.एम.रिले मध्ये प्रथम, 1500 मिटर फ्रीस्टाईल मध्ये प्रथम, 4 बाय 100 मिडले रिले , स्प्रिंग बोड़ डायनिंग सिल्वर मध्ये विजेतेपद प्राप्त करून गोल्डन मेडल मिळविन येण्याचा मान दिलीप गित्ते यांनी मिळविला आहे. बीडचे जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर व इतर अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनामुळे सुवर्ण व गोल्ड मेडल प्राप्त करु शकलो असे दिलीप गित्ते यांनी सांगितले.  तसेच पोलिस कर्मचारी दिलीप गित्ते यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकार, पोलिस प्रशासन व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment