तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

आरक्षण अंमलबजावनी करण्यासाठी शुक्रवारी पालमला धनगर समाजाचा एल्गार महामेळावा

अरुणा शर्मा                             

पालम :- धनगर समाजातील सरपंच, कार्यकर्ते, समाजसेवक, युवक-युवतींनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊन अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी पालम येथे शुक्रवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता धनगर समाजाचा आरक्षण एल्गार महामेळाव आयोजीत करन्यात आला आहे. धनगर समाजास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतच आरक्षण दिले आहे. शासन मात्र या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही. धनगर आणि धनगर असा वाद निर्माण करुन आरक्षण अंमलबजावणी पासून वंचित ठेवले जात आहे. आजवर दोन्ही काँग्रेसला धनगर समाजाने पाठींबा दिला. परंतु दोन्ही काँग्रेसने केवळ फसवणुकच केली आहे.  मागील निवडणुकीत भाजपास आरक्षण अंमलबजावनी मुद्यावरच पाठींबा दिला होत.   
  पालम येथील जायकवाडी वसहत येथे 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता एल्गार महामेळावा होणार असून या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक हे खास हेलिकॉप्टरने येणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्तमराव जानकर, गोपीचंद पडळकर, आमदार रामराव वडकुते, विठ्ठलराव रबदडे, मारोतराव बनसोडे, सुरेशराव भुमरे, डॉ. गजानन मरगीळ, शंकर वाघमारे, भीमराव सातपुते, करुणा कुंडगीर, शिवदास बिडगर, कल्याण अबुज, भगवान हाके, गोपीनाथ तुडमे, रामकिसन रवंदळे, दिनकर तिथे, नारायण पिसाळ, साहेबराव सुरनर, चंद्रकांत ताटे, नरहरी घोरपडे, रामराव उदंरे,  सुभाष धुळगुडे, मावली घोरपडे, आत्माराम सोडनर, गोपाळराव देवकते आदिं  उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, गणेशराव घोरपडे, दत्तराव घोरपडे, विजय घोरपङे, भागवत बाजगीर आदिं केले आहे.

No comments:

Post a Comment