तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

नवराञ उत्सवाला लोडशेडिंगचे ग्रहण; नागरिकांनामध्ये तीव्र संताप

(प्रतिनिधी) :-

नवरात्र माहोत्सव एक दिवसांवर येऊन थांबलेला आहे दसरा,दिवाळी, सर्व सणासुदीचे दिवस असतानाच शहरात अचानक लोडशेडिंग सुरू केल्याने नागरिकामध्ये शासन व महावितरण विरूध्द तीव्र संताप निर्माण झाला आहे. शहरातील टाऊन वन गाव भाग व टाऊन  टु मोंढा या भागात तीन टप्यात लोडशेडिंग सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना होणाऱ्या या सणासुदीच्या काळातील लोडशेडींगचा त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी संप्तत नागरिकांतून केली जात आहे.

महावितरण कडून कुठलीही पूर्वसूचना न देता परतूर शहरात लोड शेडिंग सुरू करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव तोंडावर आला असतांना या लोडशेडिंग मुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.दरम्यान याबाबत महावितरणचे अधिकारी प्रदिप निकम यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी संगीतले की राज्यात सध्या पाच हजार मेगावॅट विजेची कमतरता भासत आहे म्हणुन ग्रामीण व शहरी भागात विजेचे लोडशेडींग करण्यात येत आहे ज्या फिडर मध्ये वसुली, वीज गळती जास्त आहे अशा फिडर मध्ये कमी जास्त प्रमाणात लोडशेडिंग करण्याचे आदेश आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून प्रात झाल्याचे सांगितले

आज पासून नवरात्र उत्सवाला सुरवात होत असल्याने नव्यानेच सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे नवरात्र उत्सवावर महावितरण ने जणू ग्रहण लावल्याचे जनतेतून बोलले जात आहे. ही लोडशेडिंग तब्बल सकाळी ,दुपार व सध्याकाळ अशी आठ तास आहे.सध्या वाढत असलेल्या गर्मीने जनतेची अग्नी परीक्षा होणार असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment