तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 October 2018

वैद्यनाथ कारखान्याकडुन दिपावलीनिमित्त सवलतीच्या दरात साखर

सभासदांनी लाभ घ्यावा - ना. पंकजाताई मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
     दिपावलीनिमित्त वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासदांना सवलतीच्या दरात साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सभासदांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा तथा राज्याच्या ग्राम विकास, महिला व बालकल्याण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
      वैद्यनाथ साखर कारखान्याच्यावतीने दरवर्षी सभासद, अनाममतदार व डिपाॅझिटर्स यांना दिपावलीनिमित्त सवलतीच्या दरात साखर दिली जाते. याहीवर्षी सभासदांना प्रति किलो रू. 25 या दराने प्रति शेअर्स 10 किलो याप्रमाणे दिली जाणार आहे. दिनांक  1 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 10 ते सांयकाळी 5 या वेळेत साखरेचे वाटप केले जाणार आहे.
    विभागाप्राणे साखर वाटप केले जाणार असून विभाग व साखर वाटपाचे ठिकाण पुढीलप्रमाणे परळी विभाग  शेतकी विभागीय  कार्यालय टोकवाडी, नाथ्रा - बालवाडी शाळा, कारखाना साईट, पांगरी - पांगरी गट कार्यालय, कारखाना साईट, सिरसाळा - सिरसाळा शेतकी कार्यालयाचे बाजुला, कासारवाडी - सिरसाळा कार्यालयाचे बाजूला,  नागापुर विभाग  - नागापुर शेतकी कार्यालयाचे  जवळ नागापुर, धर्मापुरी विभाग -  धर्मापुरी शेतकी कार्यालय धर्मापुरी, घाटनांदुर - पुस्तक शेतकी कार्यालयाचे जवळ असे आहे.
     सभासदांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे, उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, कार्यकारी संचालक जी.पी.एस.के. दिक्षितुलू व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

No comments:

Post a Comment