तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 October 2018

पानकन्हेरगाव येेथे जिवे मारण्याची धमकी देत एका महिलेवर बलात्कार

विश्वनाथ देशमुख सेनगावकर

सेनगाव:-तालुक्यातील पानकन्हेरगाव येथे दि.07 आक्टोबर रविवार रोजी दुपारी 01 वाजेच्या सुमारास एका महिलेवर दोन्ही मांडीवर व बरगडीत वार करुन जखमी करीत जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्ती बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली असुन याप्रकरणातील आरोपीला सेनगाव पोलीसांनी अटक केली आहे.
पानकन्हेरगाव येथील अर्जुन संतोष देशमुख (22) याने एका महिलेला वेळोवेळी शरीरसुखाची मागणी केली होती.परंतु त्या महिलेने नकार दिला होता.दि.07 आक्टोंबर रविवार रोजी ति महिला गावा शेजारील हागनदरीत शौचास गेली असता आरोपीने तिला एकटी पाहुन खाली पाडुन तिच्या इच्छेविरुध्द बलात्कार केला.तेव्हा त्या महिलेने प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या दोन्ही मांडीवर व डाव्या बरगडीत चाकुचे वार करुन जखमी केले व नाकावर बुक्की मारुन शिविगाळ करुन याची माहिती कोनाला सांगितल्यास तुला व तुझ्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.अत्याचारग्रस्त महिलेच्या फिर्यादीवरुन सेनगाव पोलीसात आरोपी अर्जुन संतोष देशमुख याच्यावर दि.08 आक्टोंबर सोमवार रोजी गु.र.नं.222/18 कलम 376,354(अ),354(ब),324,323,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस अटक करण्यात आली असुन पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप नि.बि.आर.जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment