तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 October 2018

खात्यावर पंधरा लाखाच्या आश्वासनाची राष्ट्रवादी करणार उलट तपासणी !

परळीत "बॅलन्स चेक करो" अभिनव आंदोलन; नागरिकांनी सहभाग नोंदवावा- बाजीराव धर्माधिकारी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने देशातील जनतेला असे ला लावून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या फसव्या आंदोलनाची खिल्ली उडवत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खात्यावर पंधरा लाखाच्या आश्वासनाची ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाद्वारे  राष्ट्रवादी काँग्रेस करणार उलट तपासणी करणार आहे.बँकेत जाऊन प्रतीकात्मक पासबुक एन्ट्री करून "बॅलन्स चेक करो" असे अभिनव आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे
       केंद्रातील एनडीए सरकारला साडेचार वर्षे तर राज्यातील सरकारला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. परंतु या कालावधीत जनतेच्या नशिबी घोर निराशेशिवाय दुसरे काही आले नाही.अनेक फेकू व चमकु आश्वासनांनी जनतेला भूलथापांशिवाय पदरी काही पडले नाही. या जनविरोधी सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. हा रोष विविध मार्गाने बाहेर पडत आहे. या अनुषंगाने पंतप्रधानांनी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचा भांडाफोड करण्यासाठी परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने "बॅलन्स चेक करो" असे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे. नागरिकांनी आपापली पासबुके घेऊन इंडिया बँकेत यावे व खात्यावरील जमा तपासून घ्यावी व प्रतिकात्मक आंदोलनातून सरकारची  फसवेगिरी दाखवून द्यायची आहे.
         या अभिनव आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या फसव्या सरकारच्या फसव्या आश्वासनांची खिल्ली उडवून आपल्या रोषाची सरकारला जाणीव करून द्यावी. तरी या अभिनव आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, नगरसेवक, राष्ट्रवादी प्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्टेट बँक ऑफ इंडिया येथे आपली पासबुक घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment