तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

अन्यायकारक भारनियमन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!


मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....
          अन्यायकारक व  चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली असुन जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी पावर हाउसवर  कंदील मार्च आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती  माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.
    सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्‍या सरकारला जाब विचारावाच लागेल. परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादले आहे. शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक वीज निर्मिती केंद्र असलेले परळी  शहर भारनियमन मुक्त ठेवणे आवश्यक आहे.  या मुळे परळीकरात याबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अन्यायकारक व चुकीचे भारनियमन त्वरित बंद करावे या मागणीसाठी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी सायंकाळी ७ वा. गणेशपार पासुन  पाॅवर हाउसवर  कंदील मार्च आंदोलन करण्यात येणार आहे.
    या चुकीच्या भारनियमन व अन्यायकारक सरकारी धोरणांविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी कंदील मार्च मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment