तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

गेवराई तालुक्यातील भडंगवाडीत सरपंचाचे घर फोडले, दोन जखमी


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १० __ तालुक्यातील भडंगवाडीत मध्यरात्रीच्या दरम्यान सरपंचाचे घर फोडून गावातील दोन महीलांना बेदम मारहाण करत धाडसी चोरी केली. दरम्यान एका जखमीस बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
        गेवराई तालुक्यातील भडंगवाडी याठीकाणी मध्यरात्री १ ते ३ वाजण्याच्या सरपंच सरपंच ज्ञानेश्वर राधाकिसन नवले यांचे घर फुटले. त्यांचा एक ये दीड लाखापर्यंत मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पसार करत येथील जानकाबाई सुदाम केकरे, राणी दशरथ केकरे यांना चोरांनी बेदम मारहाण केली. दरम्यान लहान मुलास चाकूचा लावत आवाज करू नका अशी धमकी देेेऊन पसार झाले.यावेळी जानकाबाई केकरे यांस जास्त मारहाण झाल्यामुळे त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
       सरपंच ज्ञानेश्वर राधाकिसन नवले यांचे घर फोडले, दासु सुदाम केकरे यांच्या आई व पत्नीस झालेली बेदम मारहाण आणि रंगनाथ मुरलीधर भोजगुडे यांच्यासह उपरोक्त तिघांच्या घरी झालेली ही गंभीर बाब आहे. लहान मुलास चाकू लावत केलेला प्रकार धक्कादायक असून या घटनेने परिसरात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

1 comment: