तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

परळीत सराफा मार्केट मधील तीन दुकाने फोडली एक किलो चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.29
    शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील सराफ मार्केट मध्ये असलेले तीन सोने चांदीचे दुकाने सोमवारी पहाटे 4.45 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडुन एक किलो चांदीचे दागिने चोरुन नेले आहे. तसेच एका दुकानातील सीसीटीव्हीचे चार कॅमेरे फोडुन चोरट्यांनी पळवुन नेले आहेत. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच सोमवारी सकाळी शहरातील सराफ असोसिएशनच्या वतीने पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांची भेट घेऊन चोरट्यांनी अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    येथील रविंद्र डहाळे यांच्या पंकज ज्वलर्सच्या लोखंडी शटरचे कुलुप तांबीने तोडून अज्ञात चोरट्यांनी आतील लोखंडी चॅनल गेटही तोडले व दुकानात प्रवेश केला. दुकानातील एक किलो चारशे ग्रॅम चांदी मोड व शंभर ग्रॅम चांदीचे जोडवे जोड अज्ञात चोरट्यांनी घेऊन पोबारा केला अशी तक्रार रविंद डहाळे यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात दुपारी केली आहे. एकुण 29 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत.
    तसेच याच भागात असलेल्या पप्पु जगदाळे यांच्या सोन्या चांदीच्या दुकानाचा लाकडी दरवाजा काढुन चोरट्यांनी आतील सीसीटीव्हीचे चार कॅमेरे काढुन नेले आहेत. एक कॅमेरा मात्र त्याठिकाणी आहे. याशिवाय विजय डहाळे याचेही सराफा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले आतील कपाट ही तोडले परंतु त्यात त्यांनाकाही सापडले नाही. सोमवारी पहाटे एकाच दिवशी तीन दुकाने चोरट्यांनी फोडली त्यामुळे खळबळ उडाली आहे.
    सराफा मार्केट मध्ये अनेक दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सोमवारी पहाटे चोरी करणारे हे चौघेजण असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. या आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी सराफा सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल टाक, सुरेश टाक, राजाभाऊ दहिवाळ, विश्‍वनाथ शहाणे, संतोष टाक, रमाकांत टाक, दत्ता दहिवाळ यांच्यासह इतर व्यापार्‍यांनी परळीच्या शहर पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांच्याकडे केली आहे.
    सराफ मार्केट मध्ये रात्री पोलिसांची गस्त चालु असते. चोरट्यांनी पहाटे कोणीही नसल्याचे संधी साधुन दुकाने फोडली आहेत. कांही दिवसापुर्वीच परळी शहरचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी सराफा सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल टाक, रवी टाक यांच्याशी संपर्क साधुन सराफा मार्केट मध्ये घ्यावयाची काळजी याविषयी चर्चा केली होती.
    सोमवारी पहाटे घडलेल्या चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात येईल असे आश्‍वासन सराफाच्या शिष्टमंडळास पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी दिल्याची माहिती सुरेश टाक यांनी बोलतांना दिली.

No comments:

Post a Comment