तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 October 2018

" प्रेमभंग " लघुचिञपटाची शूटिंग उद्घाटन कार्यक्रम संपन्न.


तरुण पिढीला संदेश देणारा हा लघुचिञपट आहे :परशुराम वनवे
परळी /प्रतिनिधी.
                           "दोस्ती फिल्म प्रोडक्शन "प्रस्तुत नवीन लघुचिञपट "प्रेमभंग "या लघुचिञपटाचे शूटिंग उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला आहे.
            "प्रेमभंग "या लघुचिञपटाचे  चिञीकरण अंबाजोगाई परिसरात होणार आहे. व हा चित्रपट नवीन तरूण तरूणींना जिवनातील एक संदेश देणार आहे, या चिञपटा द्वारे तरूणी पिढीला नक्कीच एक चांगला संदेश मिळेल. असे मत "प्रेमभंग "चे दिग्दर्शक परशुराम वनवे यांनी व्यक्त केले.
        "प्रेमभंग "या चित्रपटाला "देवा प्रोडक्शन हाऊस "सहकार्य करीत आहे, "प्रेमभंग " या चित्रपटाचे शूटिंग उद्घाटन "होळ" या गावा मध्ये झाले आहे. उदघाटन प्रसंगी तरूण पिढीला संदेश देणारा हा लघुचिञपट आहे. असे मत " दिग्दर्शक "परशुराम वनवे यांनी व्यक्त केले आहे.
     उद्घाटन प्रसंगी "दोस्ती फिल्म प्रोडक्शन "ची सर्व टिम, "प्रेमभंग "चे दिग्दर्शक :परशुराम वनवे, सहदिग्दर्शक :पुजा गवारे, निर्माते :प्रदीप नागरगोजे, आशीष मुंडे, होळ गावचे सरपंच तात्या, कॅमेरामन : सुरज शिंदे, यशराज देवधारे, "देवा प्रोडक्शन हाऊस "चे संस्थापक आशिष मुंडे व प्रदीप नागरगोजे, अमित तांबडे, लक्ष्मण थोरवे, रघुनाथ वनवे, गुट्टे नाना, विष्णू मिसाळ, रोहित गायकवाड, नंदेश्वर वनवे व आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment