तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 October 2018

लोहपुरूष सरदार पटेल यांच्या मुळेच संपूर्ण भारतला स्वातंत्र्य मिळाले- प्राचार्य डॉ. आर के इप्पर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
  वैद्यनाथ कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला . यावेळी प्राचार्य डॉ.आर.के.इप्पर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवांदन करण्यात आले . त्यावेळी प्रा . डॉ माधव रोडे, कार्यालयीन अधिक्षक अशोक रोडे, कार्यालयीन लेखापाल नवनाथ घुले उपस्थिती होते .
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.आर.के. इप्पर म्हणाले, " सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्र एक्याचे प्रतिक असून, त्यांच्या कणखर खंबीर भुमिके मुळेच ५६२ संस्थानांवर एकसंघ , भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या संस्थानावर सैनिक कारवाई करून त्यांनी आपल्यातील पोलादी पुरुष कर्तृत्वाची चुनुक दाखवली .
देशातील शेतकऱ्याच्या ३० टक्के कर वसुल केला जात होता, सरदार पटेल यांच्या आंदोलनामुळेच तो कर ६ टक्केवर आला .
देशाची एकता व स्वातंत्र्याचे रक्षण त्यांचे जीवनाचे लक्ष्य होते . सरदार पटेल हे मुत्सदी नीती, उत्तम संघटन कौशल्य, खंबीर प्रशासक होते . त्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुळेच संपुर्ण भारताला स्वातंत्र्य मिळाले असे मत प्राचार्य डॉ आर के इप्पर यांनी व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे आयोजन रा से यो विभाग प्रा माधव रोडे, प्रा वीरश्री आर्या यांनी केले , श्री जी बी किटे, राम गोल्हेर, मुंडे एस के  विशेष सहकार्य केले ,कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment