तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गात्सवाची जि.प.सदस्य अजय मुंडे यांच्या हस्ते स्थापना

फेस्टीवलमध्ये समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन ; पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा- माधव मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे हाळम येथे ग्रामीण भागात गेल्या 11 वर्षांपासून पहिलाच हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गात्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टीवलचा महोत्सव दि.10 आँक्टोंबर पासून प्रारंभ होत आहे. प्रतीवर्षो प्रमाणे याहीवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान दि.10 आँक्टोंबर रोजी सायंकाळी 8 वाजता बीड जिल्हा परिषदेचे सदस्य अजय मुंडे यांच्या शुभहस्ते स्थापना होऊन आरती होणार आहे.  याप्रसंगी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हाळम फेस्टिव्हलचे संस्थापक तथा ग्रामपंचायत सदस्य माधव मुंडे, सार्वजनिक दुर्गात्सवाचे अध्यक्ष केशव गुट्टे, सचिव सोमनाथ गित्ते व पदाधिकारी, ग्रामस्थांनी केले आहे.

  गेल्या 11वर्षापासुन हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गा महोत्सव परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिला सार्वजनिक दुर्गा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा एकमेव सांस्कृतिक महोत्सव साजरा होत असतो. या महोत्सवात दुर्गोत्सव स्थापने पासून ते विसर्जन मिरवणुकी पर्यंत विविध कार्यक्रम आयोजन केले जाते. तसेच फेस्टिव्हल अंतर्गत रात्री 8 ते 11 दरम्यान विविध कार्यक्रम  दि.10 आँक्टोंबर रोजी स्थापन  बीड जिल्हा परिषदेचे सदस्य अजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते देवनाथ दहिफळे यांच्या हस्ते सायंकाळी 8 वाजता होणार आहे. गुरुवारी दि.11 रोजी अभिष्टचिंतन सोहळा व किर्तन वैराग्यमुर्ती ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर (नाना) यांचा र्हदय सत्कार व किर्तन होणार आहे. शुक्रवार दि.12 रोजी संगीत भजन बिभीषण महाराज मुंडे (संगीत विशारद), कु.वैष्णवी मुंडे (बाल गायक) यांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि.13 रोजी अंधश्रद्धा निर्मुलन जनजागृती हेमंत धानोरकर सर व धनंजय गुट्टे (वन्यजीव प्राणी मित्र) कार्यक्रम होणार आहे. रविवार दि.14 रोजी नेत्ररोग शिबिर स्वा.रा.ती.वै.रू.अंबाजोगाई व उदे ग अंबे उदे..!. वच्छलाबाई शिंदे (कुंडीकर) व संच सायंकाळी, सोमवार, दि.15 रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सकाळी 10 वाजता स्थळ : जिल्हा परिषद शाळा हाळम, मंगळवार, दि.16 रोजी मोफत राशन कार्डचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व धर्मापुरीचे सरपंच अँड. गोविंद फड यांच्या हस्ते संध्याकाळी 8 वाजता वाटप, बुधवार, दि.17 रोजी आर्केष्टा स्वररत्न ग्रुप सुप्रसिद्ध गायक सुभाष शेप व कलाकार सायंकाळी 8 वाजता स्थळ : जि.प.हाळम, गुरुवार दि.18 रोजी दसरा (विजयादशमी) श्री दुर्गा माता मिरवणूक संध्याकाळी 6 ते 8 तसेचव वैराग्यमुर्ती प्रभाकर महाराज झोलकर (नाना) यांचे 9  ते 11 किर्तन होणार आहे. तसेच सांप्रदायातील अनेक नामवंत किर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, वारकरी, गुणीजन मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी  महाआरती. होणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मेजवानी ग्रामीण भागातील नागरिकांना हाळम फेस्टिव्हलचे व संस्थापक माधव मुंडे यांच्या माध्यमातून मिळणार आहे.  हाळम फेस्टीव्हलच्या सर्व विविध कार्यक्रम व धार्मिक, आध्यात्मिक पर्वणीचा परळी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक तथा ग्रा.पं.सदस्य माधव मुंडे, दुर्गात्सवाचे अध्यक्ष केशव गुट्टे, सचिव सोमनाथ गित्ते ,पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ हाळम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment