तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

बाजार समितीमुळे बाजारपेठ बंद होण्याच्या मार्गावर - नंनवरे

सुभाष मुळे..
--------------
गेवराई, दि. २९ ( प्रतिनिधी ) बाजार समितीने बाहेरील जिनिंग मालकाचे जिनिंगवर जाऊन व्हिडिओ कॅमेरे व पंचनामे करून त्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न चालू केला आहे. या दबावाला बळी पडून बाहेरील जिनिंगवाले व्यवसाय बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत अशी माहिती भाजपा नेते देवा नंनवरे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे कळवले.
       गेवराई तालुका हा मूळ कापूस उत्पादकाचा तालुका असल्यामुळे गेवराईच्या परिसरात २० ते २५ जिनिंग चालू आहेत. त्यामध्ये बहुतांश जिनिंग ह्या परराज्यातील व्यापारी यांच्या मालकीच्या आहेत तर काही जिनिंग स्थानिक व्यापारी यांच्या मालकीच्या आहेत. यावर बाजार समिती कापूस खरेदी किमतीवर मार्केट व देखरेख  फिस ही शेकडा १.०५ दराने वसूल करीत होती. सदर जिनिंग मालकाने वेळोवेळी गेवराई बाजार समितीस मार्केट फिस चा दर कमी करावी म्हणून विनंती करीत असे, परंतु त्यांच्या विनंतीचा येथील बाजार समितीवर काहीच परिणाम झालेला नाही. पर्यायाने सर्व जिनिंग मालकाने आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या माध्यमातून खाजगी बाजार समिती पाडळसिंगी येथे स्थापना केली. या खाजगी बाजार समितीच्या स्थापनेस गेवराई येथील बाजार समितीने  वेळोवेळी विरोध केला, परंतु त्यांना यश आले नाही. परिणामी ही खाजगी बाजार समिती स्थापन झाल्यामुळे जिनिंग मालकांना मार्केटचा फिस दर कमी केला आणि शेतकऱ्यांच्या कापसाला देखील जास्त भाव मिळू लागला. परंतु गेवराई तालुक्यातील या शेतकऱ्यांना जास्तीचा भाव मिळत आहे, हे गेवराई बाजार समितीने नको वाटते कि काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेवराई बाजार समितीने बाहेरील जिनिंग मालकाचे जिनिंगवर जाऊन व्हिडिओ कॅमेरे व पंचनामे करून त्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न चालू केला आहे. या दबावाला बळी पडून बाहेरील जिनिंगवाले व्यवसाय बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत अशी माहिती भाजपा नेते देवा नंनवरे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे कळवले.
       गेवराईतील जिनिंगा बंद पडल्यास येथील संपूर्ण मार्केटवर परिणाम होऊन शेतकऱ्यांंच्या कापसाला भाव मिळणार नाही हे त्रिवार सत्य आहे. गेवराई बाजार समितीने स्थानिक जिनिंगचे व्हिडिओ व पंचनामे का केले नाही हे देखील न उलगडणारे कोडेच आहे. गेवराई येथील बाजार समिती व दुसरी खाजगी बाजार समिती ही पाडळसिंगी येथे असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायात स्पर्धा झाली आहे. पर्यायाने याचा फायदा गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांंच्या शेतमालास जास्तीचा भाव मिळतो आहे. यापूर्वीचा नाफेडचे खरेदीदार हे काळ्या यादीत असल्यामुळे शासनाने आधारभूत किमतीने खरेदी केंद्र हे खाजगी बाजार समिती पाडळसिंगी येथे दिले आहे. गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांंच्या फायद्यासाठीच आमदार लक्ष्मणराव पवार यांनी खाजगी बाजार समितीची स्थापना करीत असतांना गेवराई बाजार समितीने कोर्ट मॅटर करून अडथळे निर्माण केले होते, परंतु यातील सर्व अडथळे दूर करत खाजगी बाजार समितीची स्थापना करून आ. पवारांनी शेतकऱ्यांचे हिताचे काम केले आहे असेही देवा नंनवरे यांनी म्हणटले आहे.

╭ ▌▌╮
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment