तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 October 2018

परळी नगर परिषदेत करोडोचा भ्रष्टाचार वसंत मुंडे यांचा आरोप ; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी नगर परिषदेच्या खातेनिहाय दक्षता पथकामार्फत बोगस कामातील भ्रष्टाचारी अधिकारी व कंत्राटदारांची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी या संबधीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांना नुकतेच देण्यात आल्याची माहिती ओबीसी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली आहे.
या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी वैजनाथ नगरपरिषदेमध्ये मागील सन २०११ ते २०१८ या ७ वर्षापासुन सर्वच विभागात अधिकार्‍यांच्या संगनमताने कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणात बोगस कामे केली. काम न करता बिले उचलली. नगर परिषदेच्या खातेनिहाय अंतर्गत दोषी अधिकारी, कंत्राटदार यांची चौकीश करुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच न.प.च्या बांधकाम विभागात राज्य व केंद्र सरकारचा निधी केंद्रीय वित्त आयोग, रस्ते विकास विशेष अनुदान, दलितोत्तर योजना, अल्पसंख्याक वस्ती विकास योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना, नगर परिषद स्थानिक विकास निधी, मुख्यमंत्री विशेष अनुदान, गलिच्छ वस्ती सुधार योजना, जिल्हा नियोजन मंडळ विकास निधी आमदार, खासदार निधी व अन्य योजनेअंतर्गत शहरातील रोड रस्ते, नाली, पुल, सभागृह, स्मशान भुमि, कब्रस्तान, या व अन्य विकास कामासाठी प्रत्येक  वर्षी कोट्यावधीचा निधी येतो.या सर्वच कामात मोठा भ्रष्टाचार झाला असुन  कामे न करता बिले देण्यात आलेली आहे. परळी शहरात सर्व्हे नं.२ मध्ये जलालपुर येथे उद्यान नसताना त्याला विकसीत करण्यासाठी अंदाजे दिड कोटीची ई निविदा क्र.१३ बांधकाम विभाग २०१८-१९ ने काढली. ती निविदा रद्द करावी व निविदा काढणारे भ्रष्ट अधिकार्‍यांची चौकशी करावी निविदा क्र.१५ ची चौकशी करावी पुर्वी झालेल्या कामाची निविदा काढली ती त्वरीत रद्द करावी. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीराचे मॉडिफिकेशनचे काम सन २०१६-१७ मध्ये मुख्यमंत्री विशेष अनुदान मधून करण्यात आले. त्याचा वॉरटीकाळ संपलेला नसतानाही पुन्हा निविदा काढली ती रद्द करण्यात यावी. 
रमाई आवास योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस नावे लावली याची चौकशी करावी. नगरोत्थान योजनेअंतर्गत रोड, नाली, सिमेंट ब्लॉकचे निकृष्ट दर्जाचे कामे केली. काही ठिकाणीची अपुरे कामे केली याची चौकशी करुन संबधितावर गुन्हे दाखल करुन वसुली करण्याचे आदेश  देण्यात यावेत. प्रधानमंत्री आवास योजनेत कोणतेही भ्रष्टाचार होवू नये यासाठी उपाय योजना करणे काळाची गरज आहे. तसेच पाणी पुरवठा योजनेतही सन २०१२-१३ मध्ये नविन वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ४४ कोटी  रुपयाची योजना मंजूर झाली त्या कामाचा वॉरंटीकाळ अजून संपलेला नाही. सदर पाईपलाईनचे काम अद्याप पुर्ण झालेले नाही. या योजनेअंतर्गत प्रत्येक गल्लीत नविन पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. असे असतानाही नागापूर वाण धरण येथे पाणी पुरवठा विभागाने टेंडर पध्दतीने काम दिलेले आहे. तसेच मेंन्टेनस कामाची आवश्यकता नसताना खोट्या एम.बी.तयार करुन बोगस बिले उचलण्यात आली आहे, प्रत्येक वर्षी शहरात नविन बोअरची आवश्यकता नसताना फक्त बोगस बिले उचलण्याच्या हेतुने जिल्हाधिकार्‍याकडुन मोठ्या प्रमाणात निधी आणला असुन  बिले उचलण्यात आली आहे .तसेच दोषी अधिकारी मा.मुख्याअधिकारी व इंजिनिअर आर.एच.बेंडले व कंत्राटदार यांची चौकधी करुन कार्यवाही करावी,
तसेच स्वच्छता व आरोग्य विभागातही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. शहरातील १६ प्रभागात स्वच्छता करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी येतो. नगर परिषदेकडे स्वतंत्र वाहन व्यवस्था असताना टेंडर पध्तीने वाहने दाखविली आहेत, बी.ओ.टी. तत्वावर स्वच्छतेचे टेंडर देण्यात आली आहेत. आरोग्य विभागासाठी नगर पालिकेची दोन आरोग्य केंद्र आहेत. त्यात कोणतीही व्यवस्था नाही. ४० आशा सेविकांची मान्यता असताना बोगस नावे लावून त्यांचे मानधन अधिकार्‍यांच्या संगनमताने काढण्यात येत आहे. तसेच एका आरोग्य केंद्राचे बाधंकाम पुर्ण झालेले आहे. परंतु ते आजपर्यंत चालु झालेले नाही.
तसेच विद्युत विभागातही शहरातील १६ प्रभागात लाईटची व्यवस्था नगर परिषदेमार्फत करण्यात येते. यासाठी राज्य शासनाचा निधी देण्यात येतो. तसेच एर्नजी इफिसिएनसी सर्व्हीसेस लि. मुंबई यांच्यामार्फत १६ प्रभागात पोलवर एल.ई.डी.बल्प बसविण्याचे काम राज्य शासनाने केलेले आहे. त्याचा वॉरंटी काळ ७ वर्षाचा आहे असे असतानाही विद्युत विभागाने स्वतंत्र टेंडर दिलेले आहे. ज्यापोटी दरवर्षी ५० लाख रुपये कंत्राटदारास देण्यात येत असुन याची सखोल चौकशी करून संबधीत कर्मचारी व अधिकारी यांच्या कार्यवाही करण्यात यावी.
महिला व बाल विकास या खात्यामार्फत महिला व बालकांसाठी कोणतेही कार्यक्रम राबविले जात नाही. परंतु शासनाकडून आलेल्या निधीची विल्हेवाट लावण्यात येते व कार्यक्रम न घेता बिले उचलून दिली जात आहेत. तसेच शिक्षण विभाग या विभागाअंतर्गत शहरात दोन बालक मंदीर, डॉ.भालचंद्र वाचनालय, व शिवाजी नगर येथे रस्त्यावरील एक वाचनालय आहे. शहरात नगर पालिकेची एकही शाळा नाही. किंवा आंगणवाडी, बालवाडी पण नाही दोन बालक मंदीरापैकी मागील ३ वर्षापासून एक बालक मंदीर बंद आहे. शिक्षण विभागाने शहरातील मुलांच्या शिक्षणासंबधी कोणतेही ठोस पाऊले उचललेली नाही. शासनाकडून आलेला निधीत मोठा गैर प्रकार झालेला आहे. अशाअनेक तक्रारी १६ प्रभागातून परळी न.प.कडे व शासनाकडे केल्या असून सोबत जोडल्या आहेत.
तरी मा.साहेबांनी परळी वैजनाथ नगर परिषदेची सर्व खातेनिहाय दक्षता पथकामार्फत चौकशी करुन दोषी अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत. मागील ७ वर्षामध्ये जनतेच्या विकासासाठी आलेल्या निधीचा दुरुपयोग करणार्‍यावर ५० टक्के अधिकारी व ५० टक्के गुत्तेदार यांच्यामार्फत जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन वसुलीचे आदेश संबधित विभागाला देण्यात यावेत असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती  ग्रामविकास, महिला व बालकल्यामंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री  ना.पंकजाताई मुंडे मा.श्री.डि.के.जेन, मुख्यसचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई, मा.श्री.प्रधान सचिव, नगर विकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई, मा.श्री.मनोज मॅनिक / प्रधान सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांना देण्यात आल्या असल्याची माहिती महाराष्ट्र ओ.बी.सी.कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लातुर, उस्मानाबाद प्रभारी वसंत मुंडे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
                         

दि.24आँगष्ट 2018ला चौकशीची मागणी केली होती ती करण्यात आली नाही.सय्यद अल्ताफ
नगर परिषद परळी अंर्तगत करण्यात येणाऱ्या विकास कामात मोठा भ्रष्टाचार होत आहे अशी तक्रार या अगोदर ही शहरातील विविध  संघटनानी निवेदने देऊन केली होती मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत अखतरी मस्जीद ते टॉवर पर्यंत नालीचे काम का बोगस करण्यात आलेले आहे. याची सखोल चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत पोलिस स्टेशन पसुन ते टॉवर पर्यंत रोड व नालीचे काम होते पण नगर परिषदेच्या गल्थान कारभारामुळे अखतरी मस्जीद ते टॉवर पर्यंत नालीचे काम केलेले नाही सदर काम का केले नाही याचे कारण तात्काळ लेखी पत्राद्वारे द्यावे व केलेल्या प्रकाराची त्वरीत मा.मुख्यधिकारी साहेबांनी तपासणी करुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कॉंग्रेसचे ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सय्यद अल्ताफ यांनी परळीचे न.प.चे मुख्याधिकारी यांच्याकडे दि.२४ ऑगस्ट २०१८ रोजी केली होती. त्यावर अजुन कोणतीच कारवाई केली गेली नसल्याने आम्ही मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती व आमच्या तक्रारीची दखल मुख्यमंत्री महोदयांनी घेवुन चौकशीचे आदेश दिले असुन सदर बाबीचा शेवट लागे पर्यंत पाठपुरावा करत राहणार असे वसंत मुंडे यांनी सांगीतले आहे.

No comments:

Post a comment