तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

अभिनव विद्यालय येथे नवरात्र उत्सव निमित्त जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन


परळी-
     ज्ञानप्रबोधनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय येथे अभिनव नवरात्र उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन संस्थेचे सचिव साहेबराव फड व अध्यक्ष राजेभाऊ जबदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. मागिल नऊ वर्षांपासून मोठ्या उत्साहाने नवरात्र महोत्सव अभिनव विद्यालय येथे साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही अभिनव नवरात्र उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत समूह नृत्य व दांडिया नाईट्स विथ परळीकर या स्पर्धेचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले आहे. इयत्ता चौथी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य तर पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दांडिया स्पर्धा १५ व १६ अक्टोबर रोजी संपन्न होणार आहे ही स्पर्धा बीड व परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी खुली राहिल. या स्पर्धेसाठी बक्षिसाचे स्वरूप प्रथम, द्वितीय व तृतीय दांडिया साठी ५००९, ३००९, व २००९ रु रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच स्मृतीचिन्ह व समूह नृत्य साठी १५०९, १००९ व  ७०९ रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच स्मृतीचिन्ह असे असुन स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ अक्टोबर पर्यंत १०० रु प्रवेश फीस भरून आपली नाव नोंदणी सहशिक्षक इम्रान खान व श्रीकृष्ण गवळी यांच्याकडे 9823849598, 8275573945 या मोबाईल नंबर वर किंवा अभिनव विद्यालय येथे कार्यालयीन वेळत करावे असे माहिती नियोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment