तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 October 2018

ना.धनंजय मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद ; हाळम फेस्टीव्हलच्या माध्यमातून माधव मुंडे यांनी घेले आरोग्य शिबिर

हाळम येथील नेत्ररोग असलेला एकही नागरिक यापुढे उपचारांपासून वंचित राहणार नाही- माधव मुंडे

हाळम फेस्टीव्हलचा आदर्श उपक्रमात
नेत्ररोग तपासणी शिबीरात 325 रूग्णांची तपासणी व 50 रूग्णांची शस्त्रक्रियासाठी नोंदणी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  मौजे हाळम येथे हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गात्सवात आज रविवार,दि.14.रोजी नेत्ररोग शिबीर आयोजन करण्यात आले होते.
        हाळम सारख्या ग्रामीण गावात माधव मुंडे हा युवक आपल्या सहकार्या समावेत हाळम फेस्टीव्हल चालवत ह्या फेस्टीव्हल अंतर्गत गेल्या 12 वर्षा पासुन गाव हित/ लोकहिताचे उपक्रम राबवत आहेत तेही स्वखर्चाने.विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी, मजुर यांच्या साठी निस्वार्थ पणे माधव मुंडे ह्या युवकाने फेस्टीव्हल अंतर्गत उपक्रम राबवले . अशा युवकाच्या पाठीवरती प्रशासनाने प्रशंसेची थाप मारणे गरजेचे आहे. असल्याचे शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. परमार म्हणाले.
          हाळम फेस्टीव्हलचा महोत्सव दि.10 आँक्टोंबर पासून प्रारंभ करण्यात आला असून प्रतीवर्षो प्रमाणे याहीवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कांहीं दिवसापूर्वी घोषणा केली होती की, परळी विधानसभा मददारसंघीतील प्रत्येक गावात घेणार आरोग्य शिबीर तीच संकल्पनेचे पालन करून युवा नेते माधव मुंडे यांनी ह्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी रोजी  ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांना आपल्या कामामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते त्यामुळे शेतकरी यांचे आरोग्य सुदृढ राहीले पाहिजे या भुमिकेतून आपण भव्य मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजन करण्यात आले होते. हाळम येथील श्री हनुमान मंदिरात या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे डॉ. परमार यांनी श्रीफळ वाढवून यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याशिबीरास उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे संस्थापक अध्यक्ष माधव मुंडे यांनी सांगितले.  या शिबीरात 325  रूग्णांची तपासणी करण्यात आली. यातील शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या 50 रूग्णांची नोंदणी करण्यात आली असुन त्यांच्यावर लवकरच मोफत उपचार करून देण्यात येणार आहेत. दरम्यान जाण्यासाठी व आणण्याची व्यवस्था देखील मुंडे यांनी केली आहे. तसेच हाळम गावातील व परिसरातील नेत्रदोष असलेला एकही नागरिक यापुढे उपचारांपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही संस्थापक माधव मुंडे यांनी दिली. सदर शिबीरासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.परमार यांनी सहकार्य केले. यावेळी हाळम फेस्टिव्हलचे संस्थापक तथा ग्रामपंचायत सदस्य माधव मुंडे, सार्वजनिक दुर्गात्सवाचे अध्यक्ष केशव गुट्टे, सचिव सोमनाथ गित्ते व पदाधिकारी, आदी ही उपस्थित होते. गावातील शेकडो महिला, पुरुष, अबाल, वृद्ध व या संबंधित गरजू  ग्रामस्थांनी ह्या आरोग्य शिबिराचा मोफत लाभ घेतला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी अंबाजोगाई स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालय व महाविद्यालयातील कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव गुट्टे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माधव मुंडे यांनी मानले.

***********

ग्रामीण भागातील पुरुष, महिला, शेतकरी यांचे आरोग्य सुदृढ राहीले पाहिजे या भुमिकेतून आम्ही शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांच्या नेत्रदोष असू
नये असल्यास अशा रूग्णांनांची तपासणी करण्यात येईल.आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एकही नागरिक यापुढे उपचारांपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही संस्थापक माधव मुंडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment