तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 October 2018

स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त स्व.पंडीत अण्णा मुंडे चौकात अभिवादन

स्व.पंडितअण्णा मुंडे यांचे शेतकर्‍यांप्रती तळमळ असणारे व्यक्तीमत्व होते- अँड.गोविंद फड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मार्केट कमिटीचे सभापती तसेच जनसामान्यांसाठी आयुष्य वाहिलेले,शेतकऱ्यांचे कैवारी, विमा महर्षी आदरणीय स्व.पंडीतअण्णा मुंडे यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन सभापती अँड.गोविंद फड यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. राजकारणासोबतच कृषी, ग्रामविकास आणि सहकार क्षेत्रात, शेतकर्‍यांप्रति त्यांची तळमळ वाखनण्याजोगी अण्णांचे कार्य मोठे असल्याचे प्रतिपादन सभापती अँड. गोविंद मुंडे यांनी केले.

   

    शेतकऱ्यांचे कैवारी, विमा महर्षी आदरणीय स्व. पंडीतअण्णा मुंडे यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त स्व.पंडितअण्णा मुंडे चौक,स्टेशन रोड,मार्केट कमिटी समोर परळी वैजनाथ येथील स्व.पंडित अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान सभापती मुंडे म्हणाले की,अण्णा आयुष्यभर चंदना सारखे दुसर्‍यांसाठी झिजले. राजकारण आणि सहकारी क्षेत्रातील अण्णाचे मोलाचे योगदान आहे. धाकटे बंधु स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकिय जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकिय व सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी ते नेहमीच आग्रही असायचे. अनेक क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड.गोविंद फड, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दिपक नाना देशमुख, बाजार समितीचे संचालक सुरेश मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अण्णा टाक,  पाणी पुरवठा सभापती श्रीकृष्ण कराड, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, स्वच्छता सभापती विजय भोयटे, नगरसेवक शंकर अडेपवार, नगगरसेवक बालु लड्डा, सचिव बी.एल.रामदासी, गोविंद कुकर, पदमाकर शिंदे, चंदु हालगे, अमित केंद्रे, अभिजीत शेन्द्रे,अविनाश केंद्रे, राजा माने, बाळासाहेब दहिफळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन  स्व.पंडित अण्णा मुंडे चौक सुशोभीकरण सामीतीचे अँड.                                  मनजीत सुगरे, बळीराम नागरगोजे, रंगनाथ सावजी, संजय गर्जे यांनी केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, व्यापारी आणि सर्व स्तरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment