तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 October 2018

केंद्रीय पुरुष आयोग त्वरित व्हावा यासाठी पुरुष हक्क संरक्षण समितीची मागणी


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
दिल्ली : २ ऑक्टोबर २०१८ रोजी दिल्ली येथील जंतरमंतरवर उपोषण आणि आंदोलन करण्यात आले होते .देशातील ४० पेक्षा जास्त सामाजिक संघटनानी एकत्र येऊन केंद्र सरकारला पुरुष कल्याण मंत्रालयाबरोबर राष्ट्रीय पुरुष आयोग याबाबत जोरदार निदर्शने केली त्यावेळी भारतातील पहिली नोंदणीकृत संस्था पुरुष हक्क संरक्षण समितीच्या वतीने महाराष्ट्रातून अध्यक्ष अँड संतोष शिंदे पुणे, ललित ठाकुर , प्रसाद ननावरे , इजाज शेख, आदीनी  देखील निर्मिती करण्याबाबत सहभाग घेऊन जोरदार मागणी केली .त्यावेळी संसदेमध्ये पुरुष आयोगाची निर्मिती व्हावी म्हणून प्रखर मुद्दा मांडनारे लोकसभा सदस्य मा.हरी नारायण राजभर हे देखील प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते
भारतात सर्वाधिक कायद्याचा दुरुपयोग महिलाकडून होत आहे.त्यामुळे महिला कायद्याचा गैरवापर करत आहेत .हा गैरवापर कुठे तरी थांबायला हवा.तसेच अत्याचारित पती, तसेच त्यांचे नातेवाईकांना , तसेच स्री पुरुषांना न्याय मिळण्याच्या दृष्टीकोनातून कलम ४८९ ए , ४०६,३७६,३५४,कोटूबिंक हिंसाचार प्रतिबंधक कायदा , आणि सी.आर.पी.सी कलम  १२५  नुसार पोटगी तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा, घटस्फोट तसेच प्रियकरासोबत असणारे विवाह बाह्य संबंध, उघडकीला आल्यावर पती व तसेच नातेवाईक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करने त्यामुळे त्यांचावर अन्याय होतो.त्यामुळे बहुतांश पुरुष मंडळी आत्महत्या करतात त्यामुळे त्यांची संख्या वाढताना दिसते.त्यामुळे पुरुष आयोग त्वरित गठीत करावा. सी.आर.पी.सी  कलम १२५ नुसार पोटगीबाबतचे कलम रद्द करावे.हुंडा देणाऱ्यावर व ,तसेच ३७६,३५४,कलमानुसार खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर दहावर्ष शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड करावा. ४८९ ए , ४०६,३७६,३५४,कोटूबिंक हिंसाचार प्रतिबंधक कायदा ,आदी कायद्याबरोबर याच धर्तीवर पुरुषांसाठी देखील समांतर कायदा त्वरित व्हावेत व दोषींना कडक शिक्षाची तरतूद असावी उपरोक्त कायदा कलामांच्या गैरवापरामुळे आत्महत्या केलेल्या पतीच्या घरच्यांना सरकारी नोकरी अथवा पन्नास लाख रूपए भरपाई देण्यात यावी. पुरुष कल्याण मंत्रालयाबरोबर राष्ट्रीय पुरुष आयोग त्वरित गठित करावा .
त्यावेळी बहूसंख्य महिलांचा देखील उत्स्फूर्त सहभाग सम्पूर्ण देशातून होता.सेव्ह इंडियन इनोवोसेन्ट फेमिली संघटनेचे संस्थापक श्री रामनाथ दास झारखंड यांच्या वतीने पुकारलेल्या आंदोलनांमध्ये अँड संतोष शिंदे पुणे, ललित ठाकुर , प्रसाद ननावरे , इजाज शेख, अशोक द्सेरा , गोविंद वर्मा , मनोज विश्वकर्मा , लक्ष्मण खोपने , नरेश मदेरीता , जोगीदर सिंग , कपिल सक्सेसना तसेच डॉ.इंदू सुभाष मेन्स राईटच्या कार्यकर्ता व पत्रकार श्रीमती त्रेहान बरखा , श्रीमती परमिता चौधरी , अँड रेखा राणी, आदी महिलांनी महिला कायद्याचा होणारा गैरफायदा रोखण्यासाठी जोरदार नारेबाजी करून पुरुष आयोग त्वरित व्हावा याकरिता मागणी केली .तसेच सर्वोच्च न्यायलयाने व्याभीचारी पत्नीला शिक्षा न करण्याचा तसेच ४८९ए पती व त्यांचा नातेवाईकांना तात्काळ अटक करण्याचा निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करून यामुळे महिलांवर जास्त अन्याय वाढविणारे कायदे सरकार करत असल्याची खंत व्यक्त करत बहूताशी पीडित स्रिया पुरुष पीडितांनी त्यांच्या व्यथा रडवेल्या अंतःकरणाने मांडून आता तरी जसा महिला आयोग कुत्र्यासाठी आयोग , पशुपक्षी , मासे मांजरी साठी आयोग होऊ शकतो तर पुरुषासाठी आयोग का नाही असा गंभीर प्रश्न सरकारला विचारण्यात आला .त्यावेळी लोकसभा सदस्य मा.हरी नारायण राजभर देखील उपस्थित होते . पुरुष कल्याण मंत्रालयाबरोबर राष्ट्रीय पुरुष आयोग त्वरित स्थापन करावा अन्यथा संपूर्ण देशात तीव्र निदर्शने व आंदोलने काढण्यात येतील असा इशारा पुरुष आयोग राष्ट्रीय समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला .

No comments:

Post a Comment