तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

कै. विठ्ठलराव तांदळे सर यांच्या जयंती निमित्त संस्कार प्राथमिक शाळेत सकस आहार पाककला स्पर्धा संपन्न


परळी वैजनाथ दि. 09 (प्रतिनिधी) : कै. विठ्ठलराव तांदळे सर यांच्या जयंती निमित्त संस्कार प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित संस्कार ज्ञानकुंभ सप्ताहा निमित्त सकस आहार पाककला स्पर्धा संपन्न झाली.
या कार्यक्रमाची सुरूवात कै. विठ्ठलराव तांदळे सर यांच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाचे उद्‌घाटक डॉ. सौ. शितल गायकवाड, प्रमुख पाहुणे श्रीमती दहिवाळ मॅडम, सौ. रूद्रवार मॅडम, सौ. सारिका डुबे मॅडम, कु. मैथीली लोंढे मॅडम, सौ. गडम मॅडम, संस्कार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गित्ते पीआर, श्रीमती भाग्यश्री तांदळे मॅडम यांच्या हस्ते झाले.
या परिक्षक म्हणून सौ. रूद्रवार मॅडम, सौ. सारिका डुबे मॅडम, कु. मैथीली लोंढे मॅडम, सौ. गडम मॅडम यांनी सहभागी पाककला स्पर्धकांचे परिक्षण प्रत्यक्ष पदार्थाची चव, पौष्टिकता, त्या पदार्थाचा शरीराला होणारा फायदा या गोष्टी विचारात घेवून त्यांचे क्रमांक काढले तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांनी लहान मुलांना योग्य असा सकस आहार कशातून मिळतो तसेच त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये कोणत्या पदार्थाची आवश्यकता असते या बद्दल मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत मोठ्या उत्साहात बहुसंख्य पालकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम क्रमांक सौ. स्वाती मुळी (पालक भाकरी, उडीद चटणी), व्दितीय सौ. शेवंता बागवाले (उसळ, दुध, खीर) तृतीय सौ. अश्विनी मधुकर व्यवहारे (लोकी खीर), उत्तेजनार्थ सौ. अनुराधा मोदाणी (आलुटिकी, दहीवडा), उत्तेजनार्थ सौ. सोनाली जाधव ( शेंगदाना, खोबरा चिक्की) यांना मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांनी सकस चटपटी आहारांचा आनंद लुटला.
हा कार्यक्रम यशस्वी रितीने पार पाडण्यासाठी संस्कार प्राथमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment