तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 October 2018

नागमठाण येथील पुलाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन....

गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

औरंगाबाद- अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या दळण वळणाच्या व विकासाच्या दृष्टीने जोडल्या जाणाऱ्या नागमठाण ता.वैजापूर येथील गोदावरी नदीवरील पुलाचे ह.भ.प. महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती सरला बेट यांचे आशीर्वादाने व साक्षीने ,मा.ना.श्री. हरिभाऊ बागडे अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य, यांचे अध्यक्षतेखाली व मा.ना.श्री
राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते, विधानसभा महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर,आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार सुभाष झाबड,मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे, पंचायत समिती सदस्या मुक्तताई डांगे, वैजापूरच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, अनुराधा आदिक, वैजापूर पंचायत समितीच्या सभापती इंदूताई सोनवणे, श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापती दिपक पटारे, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण,बाबासाहेब काळे कार्याध्यक्ष उद्योजक, भगवान तांबे अध्यक्ष नागमठाण पूल कृती समिती यांची प्रमुख उपस्थिती होती.या पुलामुळे औरंगाबाद ते श्रीरामपूरचे अंतर कमी होणार आहे.

No comments:

Post a Comment