तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 October 2018

परतूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

आशिष धुमाळ

परतूर

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना, व्यापारी, बँकेचे व्यवहार करणारे यांना पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात येते की दीपावलीच्या सणानिमित्त पैशांचे व्यवाहार काळजीपूर्वक व सुरक्षितपणे करावे,व आपल्या वर कोणी नजर ठेवत नाही ना, कोणी आपला पाठला तर करत नाही ना याची खात्री करा, तसेच व्यापार्‍यांनी  आपल्या दुकानांमध्ये अनावश्यक व जास्तीचे पैसे रात्रीचे वेळी ठेवू नयेत,तसेच महिलांनी बाजारात जाताना व बाहेर जाताना आपल्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तुची काळजी घ्यावी. व्यापार्‍यांनी आपले दुकाने, आस्थापनाच्या ठिकाणी सिसीटिव्ही कॅमेरे बसवावेत व बसवलेले कॅमेरे व्यवस्थित काम करत आहेत का नाही याची खात्री करावी.येणारा दिपावलीचा उत्सव शांततेत व प्रकाशमय वातावरणात तसेच उत्साहात साजरा करावा.असे आवाहन पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment