तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 October 2018

ड्रॉप रोबॉलच्या सबज्यूनिअर राज्यस्तरीय स्पर्धे साठी जिल्हा संघाची निवड

प्रतिनिधी

पाथरी:-ड्रॉप रोबॉल परभणी जिल्हा असोशियशन आणि तरूण संघर्ष क्रिडा मंडळ नगर परिषद पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार १० ऑक्टोबर रोजी पाथरी येथे सबज्युनिअर राज्य अजिंक्य स्पर्धे साठी परभणी जिल्ह्याच्या ड्रॉप रोबॉल संघाची निवड घोषित करण्यात आली.
या वेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार किरण घुंबरे पाटील हे होते तर प्रमुख पाहूने म्हणून नगरसेवक सतिष वाकडे, चैतन्य अर्बन बँकेचे अध्यक्ष दत्तराव मायंदळे, लोणी बु. माजी सरपंच रघूनाथ पवार, राविकाँ तालुका अध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील, शाम शिंदे, शिखारे, शिंदे, नवघरे प्रल्हाद अब्दल, यांची उपस्थिती होती. या वेळी परभणी जिल्हा भरातून आलेल्या खेळाडू मधून १३ खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यात गणेश घांडगे, करण  जाधव, नारायण घांडगे, अमोल राठोड, निवृत्ती नाईक, दिपक सोनवळकर, अजिंक्य शिंदे, अप्रेय गोंगे, शुभम गवळी, तुषार अब्दल, रवी शिंदे, वैभव आकात, वेदांत घांडगे या खेळाडूंचा सामावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव झोडगे येथे १३,१४ ऑक्टोबर रोजी होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेत हे खेळाडू परभणी जिल्ह्याचे नेतृत्व करतील. ही निवड कैलास गुंजाळ प्रल्हाद अब्दल, रावसाहेब हनवते, क्रिडाशिक्षक दुधमोगरे यांनी केली.या वेळी दत्तराव मायंदळे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षिय समारोप पत्रकार किरण घुंबरे पाटील यांनी केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा शिक्षक दुधमोगरे यांनी केले तर सुत्र संचलन ज्ञानेश्वर घांडगे यांनी केले. तर आभार मंडळाचे अध्यक्ष भारत घांडगे यांनी मानले या कार्यक्रमा साठी तरुण संघर्ष क्रिडा मंडळ नगर परिषद पाथरीचे अध्यक्ष भरत घांडगे, उद्धव घांडगे, सर्जेराव घांडगे, प्रमोद घांडगे, श्याम घांडगे, अंगद घांडगे,राहुल गिराम,शाम शिंदे,राहुल घांडगे,गजानन घांडगे,बालाजी मानोलीकर,महमद शेख,रतन घांडगे,अविनाश घांडगे, दत्ता राठोड, सिद्धशेर गवळी,मुन्न शेख,प्रलाद आबदल, दिनेश घांडगे,कैलास गुंजाळ,भरत घांडगे,व सर्व तरुण संघर्ष क्रिडा परीवार यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment