तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 October 2018

जागृती पतसंस्था व मल्टिस्टेटच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बोनस-प्रा.गंगाधर शेळके सर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी )

शहरातील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या जागृती ना.सह.पतसंस्था व जागृती मल्टिस्टेटच्या कार्यालयीन कर्मचारी आणि पिग्मी एजंट यांना प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बोनस देण्यात येणार असल्याची माहिती पतसंस्थेचे मार्गदर्शक प्रा.गंगाधर शेळके यांनी दिली आहे.

    जागृती पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी आणि पिग्मी एजंट प्रचंड मेहनत घेत असतात त्यांच्या नियोजन व उत्कृष्ट कार्यामुळे पतसंस्थेची भरभराट होवून आज जागृती ग्रुप प्रगतीच्या  शिखरावर आहे.  पतसंस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबवतांना सभासद, ठेवीदार, व खातेदार यांना तत्पर सेवा दिली आहे. तसेच 

संस्थेच्या माध्यमातून डी.डी., लाईट बील भरणा केंद्र, शेतकऱ्यांसाठी कृषी संजिवनी योजना, बिल भरणा सुविधा, तात्काळ सोने तारण कर्ज सुविधा, पगार तारण, माल तारण, नजर गहाण कर्ज व 50 हजार रु.पर्यंत चेक ्नलेरींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.  पतसंस्थेच्या या प्रगतीत योगदान देणाऱ्या कर्मचारी व पिग्मी एजंटांना बोनस जाहिर करण्यात आले असून त्यांच्या सहकार्यामुळेच संस्थेची आर्थिक प्रगती झाल्याचे मत मार्गदर्शक प्रा.गंगाधर शेळके, संस्थेच्या अध्यक्षा प्रा.सौ.शोभा शेळके, सचिव लक्ष्मण चव्हाण, कोषाध्यक्ष सुभाष नानेकर, संचालक वसंत सुर्यवंशी, प्रा.डॉ.विजयकुमार देशमुख, जगन्नाथ महाजन, दत्तात्र्य सोळंके, मकरंद वाघमारे, महमंद आरेङ्खोद्दीन तांबोळी, मारोती बोबडे, शिवराज सोनटक्के, कार्यकारी संचालक प्रल्हाद सावंत यांनी म्हंटले आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment