तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 October 2018

भुजबळांच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा!

समता परिषदेने केले मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन!

तहसिलदारांना दिले निवेदन
किरण घुंबरे पाटील
पाथरी:-भुजबळांच्या केसालाही धक्का लागला तर संबंधितांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तहसिलदारांना निवेदन देत तहसिल कार्यालयासमोर मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन व जोरदार घोषणाबाजी करत, दोषींवर कठोर कारवाई व भुजबळांना त्वरित 'झेड' सुरक्षा देण्याची मागणी केली.

दोन दिवसांपुर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे धमकी देण्याचा प्रकार नाशिक येथे घडला. यामुळे राज्यात या घटनेचा ठिकठिकाणी तीव्र निषेध व्यक्त केला जात असुन, परभणी जिल्ह्यातही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. पाथरी तालुक्यातही मंगळवारी ३० ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सदरील घटनेचा निषेध व्यक्त करीत निनावी धमकीचे पत्र देणार्या व्यक्तीचा शोध घेऊन, त्याव कठोरात कठोर कारवाई करावी करावी. जेणेकरुन असा प्रकार यानंतर इतर कोणीही करु नये. या प्रकारामुळे छगनरावजी भुजबळ यांच्या जिवीतास धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन त्यांना 'झेड' सुरक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पाथरीचे तहसिलदार यांना देण्यात आले. त्यानंतर घोषणाबाजी करत तहसिल कार्यालयासमोर उपस्थित कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीचे दहन करुन जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी दादासाहेब टेंगसे, चक्रधर उगले, कुंडलिक सोगे, अजय थोरे, गोविंद हारकळ, दगडोबा पटने, गजानन वाघमारे, लक्ष्मणराव केंद्रे, संतोष वाघमारे, पांडुरंग चिंचाणे, मनोज बोराटे, गजानन गिराम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!

No comments:

Post a Comment