तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 October 2018

माजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक

प्रतिनिधी
परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक केली.  येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील १३५ कर्मचाऱ्यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून सर्वे नंबर ६१३ मध्ये १६ एकर ८ गुंठे जमीन घेतली होती. ही जमीन मुख्यप्रवर्तक नारायण माधवराव बुलंगे यांच्या नावे खरेदी केली होती.
त्यानंतर माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर व महसूल विभागातील तलाठी डी.एस.कदम यांनी महसुल दप्तरी बनावट व खोटे फेरफार नोंदवून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या नावे करून दिली. या प्रकरणी ज्ञानोपासक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. सोळूंके यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या सह महसुल विभागातील दत्तात्रय श्रीरंग कदम, निवृत्त तलाठी रावसाहेब भागुजी पाटील, निवृत्त मंडळ अधिकारी तुकाराम पवार, निवृत्त नायब तहसिलदार वि.गो.गायकवाड, निवृत्त मंडळ अधिकारी विजय कुलथे यांच्या विरुध्द गत वर्षी १६ डिसेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणातील तलाठी दत्तात्रय कदम यास शुक्रवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री अटक केली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. सोमवारी १५ ऑक्टोबर या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना त्यांच्या पोखर्णी येथील फार्म हाऊस मधून अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी दिली.

No comments:

Post a comment