तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 October 2018

बदनापूर, प्रतिनिधी येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित कला, विज्ञान व वाणिज्य

महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे वाडंमय मंडळाची स्थापना करून इंग्रजी भाषेच्या साहित्याचा  प्रचार व प्रसार करण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी व  इंग्रजी साहित्याविषयी भिती असते. त्यासाठी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. एम. पी. जोशी यांच्या संकल्पनेतून इंग्रजी वाडंमय मंडळाची स्थापना करण्यात येते त्यांच्या या प्रयत्नाला मोठे यश आलेले असून अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळविले आहे. इंग्रजी वाडंमय मंडळ इंग्रजी साहित्याच्या लेखकांची विविध प्रकाशने, लेखकांची माहितीवर्धक पीपीटी प्रदर्शन, भित्तीपत्रके, पोस्टर प्रेझेंटसन्स करून विद्यार्थ्यांत इंग्रजी विषयाबददल आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करते. या शैक्षणिक वर्षातील इंग्रजी वाडंमय मंडळाचे उदघाटन प्राचार्या डॉ. सौ. एम. डी पाथ्रीकर, डॉ. देवेश पाथ्रीकर, डॉ. शेख एस. एस., डॉ. खान एन. जी. यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उपप्राचार्य डॉ. गणेश गांवडे यांनी मार्गदर्शन केले व वाडंमय मंडळाचे महत्त्व विषद केले. यावेळी डॉ. भरत मिमरोट व डॉ. यशवंत हाके यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी वाडंमय मंडळाचे अध्यक्ष म्हणून शेख इरफान, उपाध्यक्ष म्हणून पंकज केदार व सचिव म्हणून प्रदीप खरात यांची निवड विद्यार्थ्यांमधून सर्वानुमते करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकास विभागप्रमुख डॉ. जोशी एम. पी. यांनी संचालन डॉ. शहजाद सिददीकी, श्रीमंत जाधव तर आभार शिवकुमार तुमवाड यांनी मानले. कार्यक्रमास मोठया संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
------------------------------------------------------------
बदनापूर तालुका तेजन्युज प्रतिनिधी अंकुश कदम पाटील 8390515197
------------------------------------------------------------

No comments:

Post a comment