तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

जाणता राजा नवरात्री उत्सव मित्र मंडळाची जययत तैयारी

समाधान भाऊसाहेब कोकाटे
निफाड तालुका प्रतिनिधी

उंबरखेडरोड, पिंपळगाव बसवंत येथील जाणता राजा मित्र मंडळ आमदार अनिल कदम आणि पंचायत समिति सभापती राजेश पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली गेल्या 20 वर्षा पासून नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहे. नवरात्र उत्सवा दरम्यान लहान मुलांसाठी चित्रकला तसेच नृत्य स्पर्धा घेतल्या जातात. महिलानसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची आणि डांडिया स्पर्धा होतात. डांडिया स्पर्धेत रोज तीन पैठण्या बक्शीस म्हणून दिल्या जातात. विजेत्या स्पर्धाकांना दर वर्षी विविध मान्यवारांच्या हातून बक्शीसे दिली जातात. सप्तमीला दर वर्ष महिलानसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रमा असतो. त्याच दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठन केले जाते. सप्तमीला सायंकाळी महाआरती ठेवली जाते. अष्ठमीला होम हवन केल्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते.
येत्या 10 तारखेला शिवसेना ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील आणि निफाड़ तालुका प्रमुख सुधीर कराड यांच्या हातून घटस्थापना होणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी दिली.
कार्यक्रमच्या यशश्वीते साठी राहुल शेळके, सुनिल बैरागी, प्रशांत राजगिरे,प्रदीप पवार, प्रवीण घुमरे, बंडू चव्हाण, महेश बच्चाव, अजित कराटे, रोहन वाणी, चांगदेव नरोडे, विकी नरोडे, दिपक सोनवणे, सोनवणे सर,समाधान वाघले, आनंद खड़ताले, विशाल मांडे, शुभम शेळके, बादल बैरागी, शुभम सैंदाने है लोक विशेष प्रयत्न करत आहेत.

No comments:

Post a Comment