तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 October 2018

गेवराईत पोलीसांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १३ __ आधार फाउंडेशन, अनुलोम व पोलीस उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी व कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. दिवस रात्र चालणारी धावपळ अचानक कोसळणारी संकटे, कमी प्रमाणात मिळणारा कुटुंबियांचा सहवास आणि आरामाचे क्षण मिळतात न मिळतात.. या सर्व गोष्टींचा विचार करून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
         आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुनराव भोसले यांनी केले, यावेळी गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, चकलांबा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, प्रसिद्ध तज्ञ डॉ.पी.के. कुलकर्णी, आधार हॉस्पिटलचे संचालक डॉ.बी.आर मोटे, डॉ.सुरज भावले (एम.डी.मेडीसिन), बीड जिल्हा आरोग्य समीतीचे सदस्य डॉ. आबेद जमादार, गेवराई डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सर्वोत्तम शिंदे, डॉ. हेमंत वैद्य, उपाध्यक्ष डॉ. हरून देशमुख, अनुलोम उपविभाग जनसेवक बसवराज वाले, गेवराई भाग जनसेवक कृष्णा वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.आबेद जमादार यांनी पोलीसांनी ट्रेस मुक्त कसे रहावे यासाठी मार्गदर्शन केले व आधार फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यातील सहभागाचा गौरवपूर्ण आढावा मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात यांनी आहार व व्यायाम या विषयावर मार्गदर्शन करतांना आधार हॉस्पिटलच्या टीमचे व अनुलोमचे आभार व कौतुक केले. कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन संतोष राऊत सर यांनी यावेळी केले तर शेवटी आभार डॉ. मोटे सर यांनी मानले.
      यामध्ये शिबिरात विविध तपासण्या करण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ, शिंदे, ऐटवार व नारायण खटाणे आदींनी परीश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment