तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 October 2018

वैष्णवदेवी महिला दुर्गोत्सव मंडळाची आरती भिवा बिडगर यांचा हस्ते संपन्न

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील आंबवेस  रोडवरील श्री बालाजी मंदिर येथील वैष्णवदेवी महिला दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गा देवीची आरती व पुजा सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांचा हस्ते आज दि.गुरुवार दि.11 आँक्टोंबर रोजी करण्यात आली. यावेळी … शक्तीची देवता असलेली माता आपणा सर्वांना सुख, शांती, समृद्धी  भरभराटी  व उत्तम आरोग्य,उदंड आयुष्य देवो व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच देवी अंबा मातेच्या चरणी नम्र प्रार्थना करण्यात आली

आज गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांच्या हस्ते येथील वैष्णवदेवी महिला दुर्गोत्सव मंडळाची दुर्गा देवीची आरती व पूजा करण्यात आली.  यावेळी भिवा बिडगर  यांचा वैष्णवदेवी महिला दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परळी वैजनाथ शहरातील आंबेवेस रोड बालाजी मंदिर येथे स्थापन करण्यात आलेल्या वैष्णवदेवी महिला दुर्गोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आलेली असून. परळी येथील हा एकमेव महिला दुर्गोत्सव आहे. यावेळी सुनीता परळीकर,प्रिती मोहेकर,अश्विनी पिंपळे,सारिका म्हाळगी,वेदश्री नागापुरे,श्वेता परळीकर,अश्विनी कुलकर्णी,भाग्यश्री म्हाळगी,सुनंदा म्हाळगी,सिंधू म्हाळगी,सुनीता बावणे,जयश्री पिंपळे,सत्यभामा आवाड,जयश्री आवाड,सुजाता मोहेकर व गोविंद मोहेकर, अमोल म्हाळगी, सागर कुरील,महेश शुक्ला, बालाजी घटमल, राहुल गडेकर, गजानन साबणे, संकेत परळीकर,आशुतोष वाघमारे, दिनेश आवाड, यश जैस्वाल, रणजीत नागापुरे प्रदीप पिंपळे, सोमनाथ गर्जे, गजानन आंबेकर यांच्यासह वैष्णवदेवी महिला दुर्गोत्सव  मंडळाचे पदाधिकारी, परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक व भाविक भक्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment