तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 October 2018

घटनेत पोलिसांनी केलेल्या तोडीच्या चर्चेला उधाण

सेलू प्रतिनिधी

  शहरातील एका महिलेच्या गळ्यातील गंठणाची चोरी झाल्यानंतर पोलिसांनी केलेला तपास आणि याप्रकरणी आरोपीने सुटकेसाठी स्वतःहा सह पोलिसावर केलेल्या हल्ल्या बरोबरच पोलिसांनी आरोपी कडून हस्तगत केलेल्या मुद्देमाल आणि संबंधिताकडून केलेली कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तोडीची रंगतदार चर्चा सेलूसह परिसरात होत आहे. याबाबतची माहिती या प्रमाणे शहरातील नंदनवन कॉलनीतील रहिवासी एका महिलेच्या गळ्यातील 44 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण एका चोरट्यांनी हातोहात पळविले होते. रहिवासी व पोलिस यांनी त्यांच्या शहरात पाठलाग केला परंतु हा इसम गंठण पळवून नेण्यात यशस्वी झाला. घटनेच्या दिवशीच्या कालावधीत या इसमाने सदर गंठण शहरातील एका सुवर्णकारास विक्री केले. आणि शहरातून पलायन केले. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गंठण चोरीप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून तर पूर्णा पोलीस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन वेगवेगळे गुन्हे या आरोपीवर दाखल झाले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातील एका पोलिसांनी जखमी होऊन देखील या आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडले. आणि उभयता वर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारा नंतर आरोपीची चौकशी करण्यासाठी व  मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी शहरात दाखल केले संबंधित सुवर्णकार यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला मात्र त्या सुवर्णकारास चोरीचा माल घेतल्या बद्दल कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी त्याची मोठी तोडी केली यांची व चोरीचा माल खरेदी करणाऱ्या त्या सुवर्णकारांची चर्चा सेलूसह परिसरात चांगलीच रंगली आहे. त्यात सुवर्णकार मात्र तिहेरी आर्थिक संकटात सापडला पण कारवाईतून मात्र सुटका झाली. ज्या इसमाने 44 हजाराचे गंठण विकत घेतले. त्या पोटी  त्यास दिलेली रक्कम, चोरीचे गंठण घेतले म्हणून मुद्दे मालाचे परत केलेले सोने, आणि यातून सुटका करून घ्यायची म्हणून पोलिसांनी केलेली तोडी या सर्वच प्रकाराने गंठण चोरी प्रकरणा पेक्षा पोलिसांनी केलेली तोडी आणि सुवर्णकारास झालेला तिहेरी भुर्दंड याच्या चर्चेला सेलू सह परिसरात उधाण आले आहे.

पोलीस अधीक्षक कारवाई चौकशी करणार का ?

जिल्ह्यात कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी कृष्णकांत उपाध्याय लाभले आहेत. त्यांनी या गंठण चोरी प्रकरणातील पोलिसांच्या तोडीची चौकशी केली तर सुवर्णकारच गंठण चोरीत कसा तिहेरी  फसला हे उघड होईल. या कारवाई ची चौकशी झाल्यास  यापुढे ना सुवर्णकार फसेल ना पोलीस तोडी करतील.

No comments:

Post a Comment