तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

सोयाबीन च्या गंजीला आग लावून शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान

अज्ञात इसमाने दिली सोयाबीन गंजी पेटवून

साखरडोह येथील घटना

वाशिम: मानोरा तालुक्यातील साखरडोह येथ गुलाबराव भोयर यांच्या साडे पाच एकरामधील सोयाबीन गंजीला मंगळवारी रात्रीला अज्ञात इसमाने आग लावल्याने त्यांचे जवळपास एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असून संपूर्ण सोयाबीन जाळून खाक झाले त्यामुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असून त्यांच्या शेतात जाऊन काल जाऊन तलाठी इंगोले कृषी सहायक डी के रणवीर ग्रामसेवक आर आर शिंदे सरपंच संतोष राऊत तंटामुक्त समिती अध्यक्ष राजगुरे प्रेमा साई फाउंडेशन चे सुशील भगत यांनी शेतात जाऊन पंचनामा केला त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत असून अध्यात्मिक गुरू प्रेमा साई यांना माहिती मिळताच त्यांनी मी शेतकऱयांच्या सोबत असून त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment