तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 October 2018

संभाजी राजेंची बदनामी करणा-यांवर तात्काळ कार्यवाही करा;राविकाँचा आयुक्तांना आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी
औरंगाबाद- शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या डॉ. शुभा साठे लिखित समर्थ श्रीरामदास स्वामी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांचा दारुड्या असा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. संभाजी महाराज हा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता, अशी ओळ या पुस्तकात छापण्यात आली आहे. त्यामुळे सरकारचं 'सर्व शिक्षा अभियानाचं' हे पुस्तक वादाच्या भोव-यात सापडलं आहे. त्यानंतर आता पुस्तकात छापलेल्या या मजकुराविषयी संभाजी ब्रिगेड सह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.संबंधीतांवर कार्यवाही करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद विभागीय आ्युक्तांना निवेदना व्दारे दिला आहे.

नागपूरमधील लाखे प्रकाशन संस्थेनं पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. या पुस्तकातील पान नंबर 18वर संभाजी महाराजां विषयी आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. 'रायगडावरून संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या-खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता.

स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तीळतीळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले, असं या पुस्तकातून छापण्यात आलं आहे. संभाजी महाराज दारूच्या नशेत असलेल्या विधानावर संभाजी ब्रिगेड नंतर आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणावर संभाजी ब्रिगेड-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ही आक्रमक झाले आहेत.

या प्रकरणी संबंधीतांवर कलम २९२ अंतर्गत तात्काळ कार्यवाही करण्या साठी क्रांती चौक पोलीसांना आणि विभागीय आयुक्तांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर राविकाँचे प्रदेश सरचिटनिस अक्षय पाटील,शहराध्यक्ष मयुर सोनवने, शहर उपाध्यक्ष अमोल दांडगे, विद्यापिठ अध्यक्ष दिपक बहीर, सकर नलावडे, सचिन उसरे, बबलू अंधारे,विकास ठाले, रावन राजपुत,परमेश्वर काष्टे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment