तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 October 2018

खरीप पिकाची चुकीची आणेवारी काढणारयावर कडक कारवाई करावी...


वसंतराव सिरस्कर

अरुणा शर्मा


पालम :- तालुक्यातील चुकीच्या पध्दतीने खरीप पिकाची आणेवारी काढली आहे. त्यामुळे तातडीने हा प्रकार बंद करुन योग्य आणेवारी काढावी अशी मागणी राष्ट्रवादीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
   सविस्तर वृत आशे कि सध्या अनेक गावात सोयाबीन पिकाची आणेवारी काढणे चालु आहे. परंतू संबधीत कर्मचारी व कंपनीचे अधिकारी संगनमत करुन चुकीची आणेवारी दाखवत आहे. खरीपाचे पिके संपुर्णताहा गेली असताना शेतात जावुन प्रत्यक्ष आणेवारी न काढता शेताच्या धुरयावर बसुन व शेतकरयाच्या सहया घेवुन आणेवारी काढत आहेत. काही ठिकाणी तर ज्या शेतात चांगले पिक आहे. त्या ठिकाणांवर उभे राहून फोटो घेतले जात आहेत.
एक तर तालुक्यात भीषण दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना मागील दीड महिन्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने संपुर्ण पिके वाळुन गेली आहेत. तरी या प्रकरणी संबंधीतना सुचना देवुन सरपंच, चेरमन व प्रतिष्ठीत नागरिक यांच्या समक्ष आणेवारी काढण्याचे आदेश दयावेत व चुकीची आणेवारी काढणारयावर कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पालमच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल आशे निवेदन तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने देण्यात आले.
निवेदनावर तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर (काका), उपसभापती रत्नाकर शिंदे, मा. सभापती नामदेव कदम, शंकर वाघमारे, जिय्या पठाण, फारुख पठाण, केशव सिरस्कर, किशोर कदम आदींसह शेतकरयांच्या स्वाक्षरया आहेत.

No comments:

Post a Comment