तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 October 2018

युवक कॉग्रेस चे पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन

सोनपेठ : येथील युवक काँग्रेसच्या वतीने
आज दि 13/10/18 रोजी दुपारी 12 वाजता बुंराडे पेट्रोल पंप, सोनपेठ, येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित दादा तांबे याच्या आदेशान्वये कॉग्रेस चे तालुध्यक्ष प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवक काँग्रेसचे नेते आंदोलनाचे आयोजक जगन्नाथ कोलते पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात युवक काँग्रेस मार्फत मोदीं सरकार चा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी युवक कॉग्रेस च्या वतीने मोदी सरकार विरोधी घोषणा दिल्या. युवक कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पेट्रोल व डिझेल दरवाढ कशी फसवी आहे हे पेट्रोल भरवायला आलेल्या लोकाना पत्रके वाटून समजवुन सांगितले.
तसेच पेट्रोल पंपावरील लोकांना लॉलीपॉप वाटून मोदी सरकारची जनसामान्यांच्या प्रती फसवणुकीची भूमिका लक्षात आणून दिली. तालुध्यक्ष मुंजाभाऊ धोंडगे यांनी आपल्या भाषणात सामान्य जनतेला आवाहन केले कि या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचे उत्तर 2019 मध्ये भाजप ला सत्तेवरून खाली आणून दयावे. जगन्नाथ कोलते पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले कि मोदी सरकारने जर  दरवाढ कमी केली नाही तर पाथरी विधानसभा मध्ये आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.

या आंदोलनात मुख्यतः तालुध्यक्ष मुंजाभाऊ धोंडगे ,पाथरी विधानसभा युवक कॉग्रेस अध्यक्ष जगन्नाथ कोलते पाटील, एन.एस.यु.आय.अध्यक्ष सुर्दशन कदम,
जावेद शेख मीडिया तालुका अध्यक्ष सोनपेठ ,नासर पठान, सचिन जगदाळे, विनोद गायकवाड़, ईशाद खुरेशी, महादेव खंबिरे, अशोक सुरवसे, कल्याण भोसले, दासु भोसले, मकसुद पठाण, रूषीकेश देशमुख, , विठल भोसले, गणेश मोकाशे, अनिल भोसले, गोविद सौळके,गोविंद जोगंदड,शरिफ सय्यद, वैजनाथ मुलगीर, अंकुश गायकवाड़, प्रल्हाद गागंर्डे, सचिन भोसले महादेव धोंडगे, राम धोंडगे भागवत काळे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment