तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढीचा निषेर्धात युवक कॉंग्रेसने केले पेट्रोल,पंपासमोर आंदोलन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सर्व सामान्य जनतेचे व वाहन धारकांचे जगने मुश्कील करणार्‍या पेट्रोल डिझेल व घरगुती वापराच्या गॅस दरवाढीचा वणवा आता चांगलाच पेटला असुन याचीच झळ पोहोंचत असलेल्या सामान्य जनतेचा आवाज घेवुन युवक कॉंग्रेसच्या वतीने आज रस्त्यावर उतरून  सकाळी ११ वाजल्यापासुन पेट्रोल पंपांसमोर उग्र आंदोलन युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले.
केंद्रातील जातीयवादी भाजपा सरकारने गेल्या ४ वर्षात पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस यांच्यात प्रचंड वाढ केली आहे. या भाववाढीवर महाराष्ट्रातील भाजपाच्याच सरकारने तडका मारून हे भाव अधिकच गंगणाला भिडवले आहेत. सन-२०१४ साली पेट ्रोल-७१ रूपये, डिझेल-५५ रूपये व घरगुती वापराचा गॅस ४६०/- प्रति सिलेंडर होता. तर हेच दर आता सन-२०१८ मध्ये पेट्रोल ९२ रूपये, डिझेल ८० रूपये व स्वयंपाकाचा घरगुती वापराचा गॅस ९१०/- रूपये झाला आहे. सामान्य जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार याच भाजपाच्या मोदी सरकारने ५ रूपयांनी पेट्रोल व २.५० रूपये डिझेल कमी करून केला. या दरवाढीमुळे सर्वच वस्तुंचे, घरगुती वापरांच्या अन्नधान्याचे भाव प्रचंड वाढल्याने सर्व सामान्य माणसाचे अक्षरक्ष: कंबरडे मोडले आहे. अच्चे दिन आणण्याच्या नावाखाली जनतेची फसवणुक करून सत्तेवर आलेल्या भाजपा मोदी सरकारला धडा शिकविण्यासाठी व सर्व सामान्य जनतेला, वाहन धारकांना
दिलासा देण्यासाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुल गांधी,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण आदेशावरून अ.भा.कॉंग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे (सर), युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय युवक कॉंग्रेस आज पासुन रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करणार आहे. याच
धर्तीवर परळीत आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणुन आज गुरूवार दि.११ रोजी सकाळी ११ वाजता शहरातील पेट्रोल पंपासमोर तिव्र आंदोलन करण्यात आले. युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष तथा मार्केट कमेटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे तसेच युवक नेते नितीन शिंदे, जम्मु शेठ, जि.प.सदस्य प्रदिप भैय्या मुंडे, राहुल कांदे, किशोर जाधव, ऍड.मनोज संकाये,सय्यद बबलु, शिवा बडे, शिवा चिखले, नवनाथ क्षिरसागर, गुलाब पठाण, प्रविण घाडगे, शेख बाबा,राहुल कराड, हनुमंत गुट्टे, बाळासाहेब पाथरकर, व्यंकटी गित्ते, गणेश घोडके, प्रा.संदिपान मुंडे, पांडुरंग सलगर, अनंत सलगर, राजाभाऊ तांदळे, शेख जावेद, सोमनाथ आघाव, रत्नेश्‍वर देवकर, शेख मुक्तार, रूक्षराज आंधळे, सय्यद जावेद, चॉंदभाई, धनंजय कावळे, हनुमंत रूपनर, गणेश सावंत, मोहन मुंडे, सोनु कांबळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment